शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

भविष्यात काँग्रेसचा ‘हात’ धरायला अनेक पक्ष उत्सुक

By admin | Updated: December 30, 2015 02:25 IST

बिहारचा अपवाद वगळता गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून जागोजागी सातत्याने पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाचे ग्रह अचानक बदलले आहेत. देशातले विविध पक्ष

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीबिहारचा अपवाद वगळता गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून जागोजागी सातत्याने पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाचे ग्रह अचानक बदलले आहेत. देशातले विविध पक्ष काँग्रेसशी जवळीक साधण्यासाठी उत्सुक आहेत. यात तृणमूल आणि डावी आघाडी असे पश्चिम बंगालमध्ये पस्परांच्या विरोधातले पक्ष आहेत तर तामिळनाडूत सध्या सत्तेबाहेर असलेला द्रमुक, काँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करण्यास उत्सुक आहे. दोन्ही राज्यात २0१६ च्या एप्रिल मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तथापि काँग्रेसने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीत द्रमुक ज्या पक्षांना निवडणूकपूर्व युतीचे निमंत्रण देईल, त्यात प्रामुख्याने काँग्रेसचा समावेश असेल, असे स्पष्ट संकेत या पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी अलीकडेच दिले होते. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पर्यंत द्रमुक युपीएचा घटक पक्ष व काँग्रेसचा विश्वासू सहकारी होता. युपीए १ व युपीए २ मधे द्रमुक केंद्रीय सत्तेत युपीएचा घटक पक्ष होता. तथापि ए. राजा, दयानिधी मारन व कनिमोळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर लोकसभेची निवडणूक उभय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. परिणामी राज्यात दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागांपैकी ३७ जागा जयललितांच्या अण्णाद्रमुकने तर २ जागा एनडीएने जिंकल्या. तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ई.एलॅन्गोवन यांनी मध्यंतरी राज्यात काँग्रेस स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवेल असे सूचक विधान केले होते. तथापि करूणानिधींच्या आवाहनानंतर काँग्रेस आपली भूमिका बदलेल काय? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस सध्या सत्तेवर आहे. २0१६ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी ममता बॅनर्जी पुनश्च एकदा काँग्रेसशी हातमिळवणी करू इच्छितात. याचे मुख्य कारण राज्यात काँग्रेसला हमखास मिळणारी ८ ते १0 टक्के मते विरोधकांकडे जाऊ नयेत, यासाठी ममता दीदींचे प्रयत्न सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत संसदेच्या मान्सून अधिवेशनापासूनच जाणवत होते. हिवाळी अधिवेशनात तर नॅशनल हेरल्ड प्रकरणापासून प्रत्येक मुद्यावर तृणमूलने काँग्रेसला मनापासून साथ दिली. काँग्रेस हायकमांडलाही पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेसबरोबर निवडणूक समझोता करण्याची इच्छा आहे, अशी राजधानीत चर्चा आहे. तथापि पश्चिम बंगालमधे काँग्रेसचे स्थानिक नेते अधिर रंजन चौधरी, दिपा दासमुन्शी वगैरे या समझोत्याच्या कडवट विरोधात आहेत. राज्यातले डावे पक्ष काँग्रेसच्या हालचालींचा अंदाज घेत आहेत. केंद्रात युपीए १ ला डाव्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा होता. अणुकराराच्या मुद्यावर डाव्यांनी युपीएचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर प.बंगालमधे सलग ३४ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षांचा २0११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने दारूण पराभव केला. गतवर्षी लोकसभेच्या निवडणुकीत या पराभवाची पुनरावृत्ती झाली. तेव्हापासून राज्यात काँग्रेसशी हातमिळवणी करण्याबाबत डावे उत्सुक आहेत. या संदर्भात मार्क्सवादी पक्षाचे महासचिव सिताराम येचुरी म्हणतात, प.बंगालमधे काँग्रेसबरोबर समझोता करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे मात्र या विषयावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जानेवारी महिन्यात पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सखोल चर्चा होईल. प.बंगालमधील मार्क्सवादी पक्षाच्या राज्य शाखेनेही केंद्रीय समितीच्या निर्णयानंतरच आपली भूमिका स्पष्ट करण्याचे ठरवले आहे.