शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करा - बबनराव शिंदे : माढा तालुका टंचाई आढावा बैठक

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

कुडरूवाडी : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची कर्ज माफी, वीज बिल माफी व विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव आ. बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत कुडरूवाडीत सोमवारी घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत करण्यात आला.

कुडरूवाडी : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची कर्ज माफी, वीज बिल माफी व विद्यार्थ्यांची फी माफी करावी तसेच माढा तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव आ. बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत कुडरूवाडीत सोमवारी घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत करण्यात आला.
माढा तालुका टंचाई आढावा बैठक कुडरूवाडी शहरातील संकेत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जि.प.चे कृषी सभापती प्रा.पंडित वाघ, शिवाजी कांबळे, माजी जि.प.अध्यक्षा निशिगंधा माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, सभापती शीलाताई रजपूत, उपसभापती तुकाराम ढवळे, रणजिसिंह शिंदे, जि.प.सदस्य प्रा.सज्रेराव बागल, झुंजार भांगे, ता.पं.सदस्य आप्पासाहेब वाघमोडे, सुंदर माळी, उमादेवी कदम, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक वामनभाऊ उबाळे, मारुतीराव बागल, आण्णासाहेब ढाणे, शशिकांत माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेविषयी बोलताना अधिकार्‍यांनी चुकीची माहिती देत, गावांना पाणी पोहोचत नसूनही पाणी पोहोचत असल्याची माहिती दिली. व्होळे व 27 गावे पाणीपुरवठा योजनेत 11 गावांना पाणी पोहोचते असे सांगितले, तर कव्हे व 11 गावे पाणीपुरवठा योजनेतील पाईप, ट्रान्स्फॉर्मर आदी साहित्य चोरीला गेले असल्याची माहितीही उघड झाली. माढा व 2 गावे पाणीपुरवठा योजनाही दुरुस्त करावी, असे सूचविले.
ज्या गावात पाणी आलेच नाही त्या गावात त्वरित टँकर सुरु करावेत व पाण्याचा प्रo्न सोडवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. व्होळे योजनेतील गावांनी प्रत्येकी 75 हजार रुपये भरुनही त्यांना पाणी नाही याबाबत नाराजी व्यक्त केली. सीनेकाठी शेततळ्यांची मागणी असून, कृषी विभागाने पुढाकार घेऊन एमआरईजीएसमधून शेततळी द्यावीत जेणेकरुन मजुरांच्या हाताला काम मिळेल.
सध्या जनावरांच्या चार्‍याचा प्रo्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रशासनाने तो त्वरित सोडवावा, चारा डेपो आवश्यक तेथे सुरु करावेत, 50 टक्के सबसिडीवर चारा डेपो काढावेत, छावण्यांसाठी संस्थांमार्फत अर्ज करावेत असेही सूचविले. मागील काळात विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 56 हजार जनावरे सांभाळली होती, यंदा मात्र कारखाना कुठलीही छावणी सुरु करणार नसल्याचेही आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तलाठय़ांना सूचना
तलाठय़ांनी पीकपाण्याचे पंचनामे करुन उतार्‍यांवर तशा नोंदी कराव्यात, ऊस जळालेला असला तर तसे लिहावे, अशा सूचनाही तलाठय़ांना देण्यात आल्या.
शंभर टक्के विहीर पुनर्भरण करा
विहीर पुनर्भरणाची कामे सर्वत्र घ्या, यामुळे शेतकर्‍यांना रोजगार मिळेल जर अधिकार्‍यांनी मनावर घेतले तर हे काम अवघड नाही. यामुळे हाताला काम मिळून पाण्याचे सिंचनही वाढेल. एमआरईजीएसमधून विहिरींना परवानगी देण्यात यावी यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रय} सुरु असल्याचेही आ.शिंदे यांनी यावेळी सांगिंतले.

अधिकार्‍यांची भंबेरी
नक्की चारा किती व यातील ओला चारा व सुका चारा किती हा प्रo्न जि.प.च्या माजी अध्यक्षा निशिगंधा माळी यांनी विचारताच अधिकार्‍यांची बोबडी वळाली़ अधिकार्‍यांनी कारखान्याच्या नोंदीवरुनच आकडेवारी सांगत असल्याचे आण्णासाहेब ढाणे यांनी आरोप केला. यापैकी किती ऊस पाण्यावाचून जळाला हे सांगा अशी विचारणा अधिकार्‍यांना केली.


विहीर, बोअर अधिग्रहण करताना त्यातील पाणी किती वेळ चालते हे आधी पाहा, असे माजी सभापती रणजितसिंह शिंदे म्हणाल़े केवळ 10 मिनिटे बोअर चालत असेल तर तसे नमूद करा. 15 दिवस बोअर चालत असेल असे सांगितले व ते बोअर केवळ 8 दिवसच चालले तर पंचायत होईल असेही रणजितसिंह शिंदे म्हणाल़े