तिसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचारावर आणखी कठोर कारवाई होणार; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 02:52 PM2024-04-02T14:52:43+5:302024-04-02T14:53:05+5:30

'आम्ही म्हणतो भ्रष्टाचार हटवा, पण विरोधक म्हणतात भ्रष्टाचार वाचवा. '

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : More strict action will be taken on corruption in the third term; PM Modi's attack on the opposition | तिसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचारावर आणखी कठोर कारवाई होणार; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

तिसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचारावर आणखी कठोर कारवाई होणार; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. मेरठनंतर पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या रुद्रपूर आणि उधम सिंह नगरमध्ये जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. गेल्या 10 वर्षातील विकास हा तर फक्त ट्रेलर आहे. आता देशाला अजून खूप पुढे न्यायचे आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरुच राहणार...
उत्तराखंडमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तराखंडमधी ही पहिलीच सभा होती. या सभेतून मोदींनी भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, भ्रष्टाचाराविरोधात सरकारची कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशाराही दिला. याशिवाय, आम्हाला उत्तराखंडला कोणत्याही किंमतीत विकसित राज्य बनवायचे आहे, यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज उत्तराखंडमध्ये ज्या वेगाने विकास होतोय, तो स्वातंत्र्यानंतर कधीही झाला नव्हता, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

काँग्रेसवर हल्लाबोल
पंतप्रधान मोदींनी कचठेवू बेटावरुन पुन्हा एकदा काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. देशाच्या सीमांचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे. आम्ही म्हणतो भ्रष्टाचार हटवा, पण आमचे विरोधक म्हणतात भ्रष्टाचार वाचवा. भ्रष्टाचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचारावर आणखी कठोर हल्ला केला जाईल, ही मोदींची हमी आहे, असे मोदी म्हणाले. यासोबतचत राहुल गांधींच्या भडकाऊ वक्तव्यावर टीका केली. अशा वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडते, असे ते म्हणाले.

काँग्रेसने तुकडे पाडणाऱ्याला तिकीट दिले
काँग्रेसला देशभक्तीचा विचार मान्य नाही. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की, देशाचा विचारही करू शकत नाही. विरोधत दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहेत, त्यामुळे आग लावण्याची भाषा करताहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दक्षिण भारत वेगळा करण्याची भाषा केली. देशाची फाळणी करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी की, नाही ते तुम्हीच सांगा. अशा लोकांचा या निवडणुकीत सफाया करा, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. 

Web Title: Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : More strict action will be taken on corruption in the third term; PM Modi's attack on the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.