शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

एकाच वेळी १0 आयएसओ मानांकने मिळवणारे भूगाव

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

पौड : ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, केंद्रप्रमुख कार्यालय, चार जिल्हा परिषद शाळा व दोन अंगणवाड्या अशी एकूण १0 आयएसओ मानांकने एकाच वेळी प्राप्त करणारे भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव.

पौड : ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, केंद्रप्रमुख कार्यालय, चार जिल्हा परिषद शाळा व दोन अंगणवाड्या अशी एकूण १0 आयएसओ मानांकने एकाच वेळी प्राप्त करणारे भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव.
ग्रामस्थ एकत्र आले तर काय करू शकतात याचेचे हे उत्तम उदाहरण. त्यांना साथ मिळाली ती शिक्षक, अंगणवाडी ताईंची. १५ ऑगस्ट २0१४ रोजी भूगाव या गावाने एक आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला. त्यातूनच आयएसओ मानांकन मिळवण्याची संकल्पना पुढे आली. ग्रामपंचायतीबरोबरच जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या तसेच शाळेचे केंद्रप्रमुख कार्यालयासही आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले, आणि गाव कामाला लागला.
मागील काही वर्षांपूर्वी एक खेडे म्हणून अस्तित्वात असलेल्या भूगावचे रूपांतर आता निमशहरी गावात झाले आहे. पुणे शहराच्या हद्दीपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाची नोंदणीकृत लोकसंख्या २0११ च्या जनगणनेनुसार ५ हजार ९७५ एवढी तर एकूण लोकसंख्या जवळपास १५ ते १६ हजारांच्या आसपास आहे. आज गावात १00 टक्के शौचालये झाली असून, गाव हगणदरीमुक्त आहे. एकूण १३ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. गावाला आतापर्यंत निर्मलग्राम, तंटामुक्ती पर्यावरणप्रेमी गाव, हगणदरीमुक्त गाव हे राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आयएसओ मानांकनासाठी असलेले ७६ प्रकारचे निकष ग्रामपंचायतीने अ श्रेणीत पूर्ण केले आहेत.

१00 टक्के टँकरमुक्त
गावाला दररोजच्या वापरासाठी व पिण्यासाठी एकूण ७ लाख लिटर पाणी लागते. त्यातील १ लाख लिटर पाणी महानगरपालिकेकडून मिळते. ते पुरेसे नसल्याने गावातील एक ग्रामस्थ व तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब चोंधे यांनी स्वत:च्या शेतीतील खासगी विहिरीचे पाणी गावासाठी चोवीस तास उपलब्ध करून दिले आहे. मागील वर्षी टँकरने पाणी पिणारे भूगाव आज १00 टक्के टँकरमुक्त झाले आहे.
चौकट
प्रशस्त व आधुनिक स्मशानभूमी
गावातील स्मशानभूमी प्रशस्त व आधुनिकपणे बांधण्यात आली आहे. या ठिकाणच्या धुराच्या प्रदूषणाचा त्रास जवळच्या ग्रामस्थांना होऊ नये यासाठी येथे स्वयंचलित निर्धूर यंत्रणा बसवण्यात आली असून, पावसाळ्यासाठीचा आवश्यक निवारा, वीज, पाणी, आप्तेष्टांसाठी विसावा कक्षही तयार करण्यात आला आहे.
ग्रामसचिवालयाची सुसज्ज व अद्ययावत इमारत असून, दैनंदिन कामकाजासाठी एकूण आठ कक्ष तयार केले आहेत. ग्रामस्थांच्या सोयीकरिता लागणारी सर्व कार्यालये एकाच छताखाली आणलेली आहेत.
संपूर्ण रस्त्याचे सिमेंटीकरण झाले असून, सर्व रस्ते सातत्याने कचरामुक्त ठेवण्यात येतात.
मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे यांची साफसफाई ग्रामपंचायतीचे चार कर्मचारी, अन्य ६ मजूर व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने केली जाते.
ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पद्धत अवलंबण्यात येते.
गावाच्य सुरक्षेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे .
सातवीपर्यंत असलेल्या दोनही शाळांत प्रत्येक २ हजार पुस्तकांची सुसज्ज ग्रंथालये आहेत.
शाळेत सर्व आर्थिक स्तरातील मुली शिक्षण घेतात. इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा कल कमी होऊन शाळेच्या पटात लक्षणीय वाढ झाली आहे.

कोट............................
सरपंचाचे पद हे केवळ मिरवण्याकरिता नसून, सर्व समस्या सोडविणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असते. मी त्यासाठी काम केले, त्यामुळे आम्हाला हे यश मिळाले.
विजय सातपुते, सरपंच
ग्रामस्थांच्या व पालकांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही शाळेचा विकास अशक्यच. तसेच सहकारी शिक्षकांनी कामात झोकून दिल्याशिवाय शाळेची गुणवत्ता वाढणेही अशक्य.
लहू बाबा गायकवाड, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक
गावातील जबाबदार नागरिकांनी पदावर विराजमान असलेल्या व्यक्तींना योग्य सल्ला, मार्गदर्शन केले तर गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या नवीन कल्पना अमलान येऊ शकतात. आम्ही तेच केले.
- दगडू काका करंजावणे, संंकल्पनेचे प्रेरक
फोटोओळी.......
१) भूगाव ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत.
२) बायोमेट्रिक पद्धतीने स्वत:ची उपस्थिती नोंदवताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी.