डेहराडून : उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील जुआलगडजवळ शनिवारी दुपारी प्रवाशांनी खच्चून भरलेली एक बस नियंत्रण सुटल्याने खड्डय़ात कोसळून झालेल्या अपघातात 16 जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले आहेत. हरिद्वारहून कर्णप्रयागला जात असलेल्या या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटल्याने ती खड्डय़ात कोसळली.