शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

बंगळुरूत बनली भारताची पहिली चालकरहित कार

By admin | Updated: March 17, 2016 04:56 IST

बंगळुरू येथील सॉफ्टवेअर तांत्रिक तज्ज्ञ रोशी जॉन एकदा विमानतळावरून टॅक्सीने घरी जात असताना झोपेच्या डुलक्या घेणाऱ्या चालकाने वाहन दुसऱ्या वाहनावर जवळजवळ धडकवले होते.

चेन्नई : बंगळुरू येथील सॉफ्टवेअर तांत्रिक तज्ज्ञ रोशी जॉन एकदा विमानतळावरून टॅक्सीने घरी जात असताना झोपेच्या डुलक्या घेणाऱ्या चालकाने वाहन दुसऱ्या वाहनावर जवळजवळ धडकवले होते. त्यानंतर जॉन स्वत: टॅक्सीचा ताबा घेत घरी पोहोचले, पण मृत्यूच्या दाढेतून बाहेर येण्याचा हा प्रसंग ते विसरू शकले नाहीत. पाच वर्षांनी त्यांनी मित्रांच्या मदतीने ‘टाटा नॅनो आॅटोनॉमस’ ही देशातील पहिली चालकरहित कार विकसित करीत एका स्वप्नाची पूर्तता केली आहे.जॉन हे टीसीएसमध्ये रोबोटिक यंत्रणेचे प्रमुख असून त्यांनी आपल्या २९ सदस्यांच्या चमूसह ही कार तयार केली आहे. ३ डी मॉडेल असलेल्या या कारची अद्याप रस्त्यावर पूर्ण चाचणी व्हायची आहे. त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांची परवानगी हवी आहे. (वृत्तसंस्था)अशी झाली कार तयार...2011 मध्ये जॉन यांनी टाटा नॅनो कार खरेदी केली. जगभरात निस्सान, जनरल मोटर्स, बीएमडब्ल्यू, गुगल आणि टेल्सा यासारख्या कार कंपन्यांनी ड्रायव्हरविना चालणाऱ्या कारचा विकास करण्यासाठी गुंतवणूक चालविली असताना जॉन यांनी नॅनोची निवड केली. गुगलच्या स्वयंचलित कारने कॅलिफोर्नियात एका सार्वजनिक बसला धडक दिल्याची बातमी अलीकडेच चर्चेचा विषय ठरली असताना जॉन यांच्या कारची चर्चा जोर धरू शकते.अनेकांनी घेतला संशयमे २०१२ मध्ये जॉन यांच्या स्वयंचलित कारने बंगळुरूच्या रस्त्यावर पहिली धाव घेतली होती. हा अनुभवही त्यांच्यासाठी अनोखाच ठरला. पोलीस वारंवार चौकशी करायचे. कॅमेरे आणि आतील अनेक संगणकांबद्दल संशय व्यक्त करायचे. अन्य कामांची जबाबदारी असताना या प्रकल्पासाठी वेळमर्यादाही पाळायची होती, असे त्यांनी सांगितले.