थिवी औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र उपकेंद्र
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
बार्देस : वारंवार खंडित होणार्या वीज प्रवाहामुळे थिवी औद्योगिक वसाहतीतील उद्योगधंद्यांना कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत होते. त्यातून अनेकांना मोठा आर्थिक फटकाही बसत होता. त्यामुळे थिवी इंडस्ट्रीयल इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनने थिवी औद्योगिक वसाहतीत एक स्वतंत्र वीज उपकेंद्र स्थापन करावे, असे निवेदन सरकारकडे केले होते. त्याला अनुसरून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे उपकेंद्र स्थापण्यासाठी एक भूखंड या असोसिएशनला दिला आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष सूरज मंत्रवादी यांनी सांगितले.
थिवी औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र उपकेंद्र
बार्देस : वारंवार खंडित होणार्या वीज प्रवाहामुळे थिवी औद्योगिक वसाहतीतील उद्योगधंद्यांना कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत होते. त्यातून अनेकांना मोठा आर्थिक फटकाही बसत होता. त्यामुळे थिवी इंडस्ट्रीयल इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनने थिवी औद्योगिक वसाहतीत एक स्वतंत्र वीज उपकेंद्र स्थापन करावे, असे निवेदन सरकारकडे केले होते. त्याला अनुसरून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे उपकेंद्र स्थापण्यासाठी एक भूखंड या असोसिएशनला दिला आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष सूरज मंत्रवादी यांनी सांगितले.सरकारकडून मिळालेल्या भूखंडाचे कागदपत्र वीज खात्याचे कार्यकारी अभियंता राजगोपालन यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सूरज मंत्रवादी बोलत होते. या वेळी जीआयडीसीचे फिल्ड व्यवस्थापक जितेंद्र गवंडळकर, साहाय्यक अभियंता नोर्मन आताईद, असोसिएशनचे सचिव योगेश शेटगावकर उपस्थित होते.मंत्रवादी पुढे म्हणाले, या उपकेंद्रामुळे वीज समस्येची सुटका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कारखान्याची काम करण्याची कार्यक्षमता वाढेल. शिवाय व्यावसायिक व कामगारांना फायदा होणार आहे. थिवी औद्योगिक ही गोव्यातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. यात १२० छोटे-मोठे कारखाने आहेत. हजारो कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी या कारखान्यावर अवलंबून आहेत. हे उपकेंद्र लवकर कार्यान्वित करून सरकारने उद्योगधंद्यांना चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी) फोटो : भूखंडाची कागदपत्रे राजगोपालन यांच्याकडे सुपूर्द करताना सूरज मंत्रवादी. डावीकडून योगेश शेटगावकर, जितेंद्र गवंडळकर व नोर्मन आताईद. (प्रकाश धुमाळ) १६०२-एमएपी-१२