शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

महत्वाचे कॉलम न्यूज

By admin | Updated: September 4, 2015 23:50 IST

प्रौढ नागरिक मंडळातर्फे शिक्षकांचा गौरव

प्रौढ नागरिक मंडळातर्फे शिक्षकांचा गौरव
नाशिक : शिक्षकदिनानिमित्त प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे तारा अनंत साळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. डिसुझा कॉलनीत होणार्‍या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूर्यनमस्कार प्रशिक्षणाचा समारोप
नाशिक : संत वेणास्वामी मठ, नाशिक शाखेतर्फे सूर्यनमस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी नियमित सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले.
स्वयंसेवकांना देणार ग्रीन कुंभाचे प्रशिक्षण
नाशिक: सिंहस्थानिमित्त विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन भाविकांच्या मदतीसाठी समाजपयोगी काम करत असतात. भाविकांच्या मदती सोबतच पर्यावरणाचेही संतुलन राखले जावे यासाठी वुमन्स सोसायटीतर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शाही मार्ग - रहिवाशांना सार्वजनिक शौचास बंदी
नाशिक : सिंहस्थ पर्वणी काळात शाही मार्गावर राहणार्‍या रहिवाशांना सार्वजनिक शौचावर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन, नदीचे पावित्र्य, शाही मार्ग स्वच्छ रहावा असा यामागचा उद्देश आहे.
साधुग्राममध्ये स्वाईन फ्लूचे सावट
नाशिक : वातावरणातील बदलाचा परिणाम शहराप्रमाणे साधुग्रामवरदेखील झाल्याने तसेच साधुग्राममध्ये विविध भागातील भाविकांची संख्या यामुळे स्वाईन फ्लूची साथ पसरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात पार्किंगच्या समस्येत वाढ
नाशिक :एमजी रोड तसेच द्वारका ते सारडा सर्कल परिसरात अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यापेक्षा वाहतूक समस्या सोडवण्यावर भर देणे अपेक्षित आहे.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
नाशिक : सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून रात्रीच्या वेळी वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. कुत्रे वाहनचालकांना अडथळा ठरत असून अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.
पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अडथळा
नाशिक : के.के.वाघ महाविद्यालय तसेच लोकमान्य हॉस्पिटलसमोर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संबंधित संस्थांमध्ये पार्किंगसाठी जागा असूनही बाहेर पार्किंग केली जात असल्याने वाहतुकदारांनी नाराजी व्यक्त केली.
उड्डाणपुलाखाली गवताचे साम्राज्य
नाशिक : सिंहस्थ पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र स्वच्छता राखण्याचा प्रयत्न सुरू असूनही मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली मात्र गवताचे साम्राज्य वाढले असून उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.
शहरात औषध फवारणी करणे गरजेचे
नाशिक : पावसाने दडी मारल्याने वातावरणात बदल झाला असून यामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून शहरात औषध फवारणीची मागणी होत आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहातदेखील स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.
जेलरोड परिसरात घाणीचे सम्राज्य कायम
नाशिक : सिंहस्थ पर्वणी तोंडावर आली असूनसुध्दा जेलरोड तसेच टाकळी परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले असून शहराच्या ठरावीक भागातच स्वच्छता होत असल्याने नागरिकांनी नाराजी दर्शविली आहे.
वाहनचालकांकडून वाहतूक लेनचे उल्लंघन
नाशिक : जुने सीबीएस आणि मेळा बसस्थानक परिसरात शहराकडून कॉलेजरोडकडे जाणार्‍या मार्गावर अनेक वाहनधारकांकडून ओव्हरटेक करण्यासाठी दुभाजक प˜्यांचे नियम पाळले जात नाही, तसेच वाहनवेगावर मर्यादा घालण्याची मागणी होत आहे.
चेहडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी
नाशिक : चेहडी परिसरात ठिकठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य असून, डासांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मनपा सफाई कर्मचारी या परिसरात फिरकत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.