हॅलो-३ म्हापशात उद्या शिवजयंती
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
बार्देस : बार्देस तालुका शिवछत्रपती जयंती समारोह समितीतर्फे गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ८.३० वा. म्हापसा येथील हुतात्मा चौक येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजिले आहेत.
हॅलो-३ म्हापशात उद्या शिवजयंती
बार्देस : बार्देस तालुका शिवछत्रपती जयंती समारोह समितीतर्फे गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ८.३० वा. म्हापसा येथील हुतात्मा चौक येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजिले आहेत. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून म्हापशाच्या नगराध्यक्षा रूपा भक्ता यांच्या हस्ते श्री शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर पत्रकार परेश प्रभू हे शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतील. या वेळी समितीचे अध्यक्ष गुरुदास नाटेकर उपस्थित राहाणार आहेत. प्रारंभी सरकारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा अन्साभाट-म्हापसा व ज्ञानप्रसारक विद्यालयाचे विद्यार्थी गीते सादर करतील. या कार्यक्रमाला बार्देस तालुका व इतर परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव विश्वासराव नागवेकर व सहसचिव प्रकाश धुमाळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी)