शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी, भूसंपादन मागे पडण्याची चिन्हे

By admin | Updated: April 24, 2016 04:14 IST

संसदेचे अधिवेशन सोमवारपासून प्रारंभ होत असून उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट आणि शत्रू संपत्ती वटहुकूमाला मंजुरीसह प्रलंबित वस्तू आणि सेवाकर (जीएसटी), भूसंपादन

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

संसदेचे अधिवेशन सोमवारपासून प्रारंभ होत असून उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट आणि शत्रू संपत्ती वटहुकूमाला मंजुरीसह प्रलंबित वस्तू आणि सेवाकर (जीएसटी), भूसंपादन विधेयकाचेही मोठे आव्हान केंद्र सरकारसमक्ष आहे.सहा नवीन सदस्यांची नियुक्ती आणि काही प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यानंतरही राज्यसभेत सरकारला बहुमत नाही. त्यामुळे प्रथम संसदेचे कामकाज सुरळीत करण्यावर सरकारचा भर राहणार असून त्यानंतर हे मुद्दे मांडले जातील. सरकारने मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आम्हाला संघर्ष नको असून कुठल्याही मुद्यावर चर्चेची तयारी असल्याचे यापूर्वीच कळविले आहे. दुसरीकडे काँग्रेसला सुद्धा संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याची इच्छा नाही. परंतु पक्षातर्फे उत्तराखंडमध्ये अधिकाराचा गैरवापर, दुष्काळ परिस्थितीची चुकीच्या पद्धतीने हाताळणी आदी मुद्यांवर मात्र विरोध केला जाईल. अधिवेशनात सरकारचे मुख्य प्राधान्य लोकसभेने मंजूर केलेल्या आणि राज्यसभेत अडकलेल्या सात विधेयकांशिवाय सर्वसामान्य अर्थसंकल्प व रेल्वे अर्थसंकल्प विधेयकाचा मार्ग मोकळा करून घेण्याला असणार आहे. या सात विधेयकांमध्ये खाण आणि खनिज (विकास व नियमन) दुरुस्ती विधेयक, व्हिसल ब्लोअर संरक्षण दुरुस्ती विधेयक, भारतीय विश्वस्त संस्था दुरुस्ती विधेयक, उद्योग (विकास व नियमन) दुरुस्ती विधेयक, कॉन्स्टिट्यूशन (शेड्युल कास्टस) आॅर्डर (अमेंडमेंट) आणि रिपिलिंग अ‍ॅण्ड अमेंडिंग (थर्ड) बिल या विधेयकांचा समावेश आहे.काँग्रेसच्या आग्रहाखातर शत्रू संपत्ती विधेयक प्रवर समितीकडे वर्ग करण्यात आले होते. हे विधेयक मंजूर झाले नाही तर सरकार पुन्हा यासंदर्भातील वटहुकूम काढेल. राज्यसभेत बहुमताअभावी जीएसटी विधेयकाच्या बाबतीतही सरकार नशिबावरच अवलंबून आहे.उत्तराखंडचा जेथवर प्रश्न आहे सरकार यापुढे कुठलीही कार्यवाही करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करेल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्येच गुंडाळण्यात आले होते आणि आता २५ एप्रिलपासून सुरू होणारे अधिवेशन हे तांत्रिकदृष्ट्या अर्थसंकल्पीय अधिवेशन नाही. हे नवे सत्र असून १५ बैठकांसह १३ मे रोजी त्याचा समारोप होईल.सरकारने लोकपाल आणि लोकायुक्त व इतर संबंधित कायदे दुरुस्ती विधेयक २०१४ आणि भूसंपादन दुरुस्ती विधेयकाचाही आपल्या यादीत समावेश केला असला तरी वेळेच्या कमतरतेमुळे ही दोन विधेयके मांडली जाण्याची शक्यता कमी आहे. १५ मंत्रालयांना निधी वाटपाच्या मागणीवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नवीन महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत त्यांच्याशी संबंधित मंत्रालयांची यासाठी निवड करण्यात आली आहे.