सांताक्लॉजकडून भेटवस्तूचे वाटप : ख्रिसमस कॅरर्ल्ससह धार्मिक कार्यक्रम उत्साहात चर्चमध्ये हर्षोल्हासात प्रभू यशू यांचा जन्मोत्सव
By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST
जळगाव : प्रभू येशू यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील तीनही चर्चमध्ये शुक्रवारी हर्षोल्हासाचे वातावरण होते. प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांनी नाताळ साजरा झाला. चर्चमध्ये दिवसभर भाविकांची गर्दी होती. चर्चवरील नेत्रसुखद रोशणाई सार्यांचे लक्ष वेधून घेत होती.
सांताक्लॉजकडून भेटवस्तूचे वाटप : ख्रिसमस कॅरर्ल्ससह धार्मिक कार्यक्रम उत्साहात चर्चमध्ये हर्षोल्हासात प्रभू यशू यांचा जन्मोत्सव
जळगाव : प्रभू येशू यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील तीनही चर्चमध्ये शुक्रवारी हर्षोल्हासाचे वातावरण होते. प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांनी नाताळ साजरा झाला. चर्चमध्ये दिवसभर भाविकांची गर्दी होती. चर्चवरील नेत्रसुखद रोशणाई सार्यांचे लक्ष वेधून घेत होती. अलायन्स चर्चमध्ये बायबल वाचन व विश्वशांतीसाठी प्रार्थनापांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्च येथे सकाळी साडे नऊ वाजता फादर रेव्ह.शशिकांत एम.वळवी यांच्या उपस्थितीत प्रार्थना व उपासनेला सुरुवात झाली. प्रारंभी ख्रिन बांधवांनी ख्रिसमस कॅरर्ल्स (नाताळ गीत) सादर केली. त्यात युवक संघ व लहा बालकांचा सहभाग होता. त्यानंतर नाताळ संबधातील शास्त्रपाठ व बायबलचे वाचन करण्यात आले. यावेळी ख्रिस्ती बांधवांतर्फे विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. उपासनेनंतर सर्व बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. फादर रेव्ह.शशिकांत एम.वळवी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, भगवान येशू शांतीचे अधिपती होते. येशू यांची शिकवण ही सर्व मानवासाठी आहे. त्यांच्या शिकवणीनुसार आचरण केल्यास मनाला शांती मिळते. आज कुटुंबाला, समाजाला व राष्ट्राला शांतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सेंट. फ्रॅन्सिस डी. सेल्स चर्चया चर्चमध्ये २५ रोजी पूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम झाले. येशू जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर फादर अब्राहम येशूचा जन्मोत्सवाबाबत माहिती दिली. भगवान येशू यांनी जगाला प्रेम, दया, शांतीचा संदेश दिला. त्यांच्या विचाराची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. नाताळनिमित्त चर्चवर आकर्षक रोशणाई करण्यात आली. दिवसभर बांधवांनी चर्चमध्ये येत उपासना केली. तसेच नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या.सेेंट थॉमस चर्चमेहरुण तलाव परिसरातील या चर्चमध्ये ख्रिन बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन येशू जन्माचा संदेश देण्यात आला. २४ रोजी रात्री ११.४५ वाजता पूजेसाठी सजावट करण्यात आली होती. २५ च्या पहाटे पर्यंत ग्लोरियन नाईट साजरी करण्यात आली. तसेच २४ च्या रात्रीपासून ते २५ च्या रात्रीपर्यंत २४ तास चर्च खुले ठेवण्यात आले होते. २५ रोजी फादर बिजू यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना करीत भगवान येशू यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. नाताळ सणाची सर्वांना माहिती व्हावी म्हणून २५ रोजी दिवसभर सेेंट थॉमस चर्चमध्ये प्रोजेक्टरद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजीमधून माहिती देण्यात आली.