सिन्नर: येथील गणेश चौकातल्या श्रीकृष्ण मित्र मंडळ व रामरथ उत्सव समितीच्या वतीने गणेश चौकासह शेटे व जाखडी गल्लीतील नागरिकांसाठी मोफत वाटपास प्रारंभ करण्यात आला.रमेश देशमुख व संदीप लोखंडे यांच्या मालकीच्या कूपनलिकेतून दररोज एक तास नागरिकांना मोफत पाणी देण्यात येत आहे. आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवींद्र काकड, रामरथ उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते सदर उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी चंदन देशमुख, किरण नलावडे, समीर तहसीलदार, अमोल शेवाळे, रंगनाथ देशमुख, राजेंद्र उगले, प्रकाश इंदुरकर, आण्णा नलावडे, बंटी देशमुख, अनिल सोनवणे, प्रशांत सिकरे, सागर जाखडी, गणेश क्षत्रिय आदींसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)फोटो क्र. - 22२्रल्लस्रँ03फोटो ओळी - सिन्नर येथील गणेश चौकात मोफत पाणी वाटप उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, दीपक खुळे, रवींद्र काकड, प्रमोद पाटील, चंदन देशमुख, किरण नलावडे, समीर तहसीलदार, अमोल शेवाळे आदींसह नागरिक.
सिन्नर येथे मोफत पाणी वाटप
By admin | Updated: May 22, 2016 23:54 IST