फ्लेमिंगो पार्कच्या उभारणीत येणार अतिक्र मणे अन् प्रदूषणाचे अडथळे
By admin | Updated: August 6, 2015 22:08 IST
ठाणे : ठाण्यात असणारी खाडी ही शहराची ओळख असली तरी बेकायदा बांधकामे, कचरा, सांडपाणी यामुळे ती गटार बनली आहे. यामुळे खाडीतील मासे तसेच इतर जीवजंतू नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणार्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे अस्तित्व टिकणे कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून या परिसराला फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य जाहीर करावे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
फ्लेमिंगो पार्कच्या उभारणीत येणार अतिक्र मणे अन् प्रदूषणाचे अडथळे
ठाणे : ठाण्यात असणारी खाडी ही शहराची ओळख असली तरी बेकायदा बांधकामे, कचरा, सांडपाणी यामुळे ती गटार बनली आहे. यामुळे खाडीतील मासे तसेच इतर जीवजंतू नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणार्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे अस्तित्व टिकणे कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून या परिसराला फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य जाहीर करावे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.ठाणे खाडीत पूर्वी रेवू, कटला आदी प्रकारचे मासे मिळत होते. मात्र, प्रदूषणामुळे माशांची पैदास क मी झाल्याने खाडीमध्ये वास्तव्यास असणार्या फलेमिंगोंचीही उपासमार होत आहे. राज्य शासनाच्या वन विभागात खारफुटी विभागाची स्थापना २०१२ मध्ये झाली. खारफुटी क्षेत्रामधील जवळपास १ हजार झोपड्यांचे अतिक्रमण हटविले असून मुंब्रा रेतीबंदर, मानखुर्दपासून वाशी रेतीबंदरपर्यंत असलेल्या खाडीला फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात येणार असून नियंत्रित पर्यटनाला परवानगी दिली जाणार आहे. मात्र, शहरीकरण व कारखानदारी वाढल्याने ठाणे खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे खाडीच्या प्रवाहात विविध ठिकाणच्या पाण्याच्या पातळीचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार अनधिकृत वस्तींमधून टाकण्यात येणारा कचरा तसेच खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे त्याच्या खांबांजवळ बांधकामांचा कचरा टाकला जातो. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच खाडी परिसरात वाढणार्या झोपडीधारकांना राजकीय वरदहस्त असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. हा भाग महसूल खात्याच्या हद्दीत येत असल्याने वन खात्याला या भागातील अतिक्रमणे हटविणे शक्य होणार नाही. परिणामी, फ्लेमिंगो पार्कची उभारणी करण्यासाठी वन खात्याला अनेक अडथळे पार करणे गरजेचे आहे. ..............................वाचली - नारायण जाधव