फेरमतमोजणीची मागणी
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
लातूर : अहमदपूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बोडका या संस्थेच्या संचालक मंडळ निवड प्रक्रियेतील मतमोजणी बेकायदेशीरपणे करून मतपेट्या सिल न करता चुकीचा निकाल जाहीर केल्याने फेरमतमोजणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उमाकांत कानवटे, बाळू कानवटे, कलुबाई पाटील, नागिनबाई कांबळे, हरिराम देवनाळे, देविदास नादरगे, श्रीराम कोतलापुरे, फतरु बेग आदींनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे फेरमतमोजणी करून निवडणूक अधिकार्यांची चौकशी करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.