कृषीदुतांचा निमगाव(माळेवाडी)ज्
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
ालसंधारणेचा कानमंत्र प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचा उपक्रम
कृषीदुतांचा निमगाव(माळेवाडी)ज्
ालसंधारणेचा कानमंत्र प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचा उपक्रमशिर्डी-राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दुतांनी शिर्डीजवळील निमगाव(माळेवाडी) मध्ये शेतकर्यांशी संवाद साधुन जलव्यवस्थापन,मासे पालन आदींच्या आधुनिक तंत्राची ओळख करून दिली़कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषी दुतांनी निमगावला (माळेवाडी) भेट देवुन शेततळ्यांची पहाणी केली़यावेळी त्यांनी शेततळ्याची लांबी,रूंदी व खोलीचे प्रत्यक्ष मोजमापे घेवुन त्या शेततळ्यात किती पाणी साठेल,एक हेक्टर क्षेत्रासाठी किती आकाराचे शेततळे आवश्यक आहे याबाबत परिसरातील शेतकर्यांना माहिती दिली़याशिवाय शेततळ्यातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन,नियोजन आदीं माहितीची त्यांनी शेतकर्यांशी देवाण-घेवाण केली़शेतकर्यांनी जोड धंदा व उत्पन्न वाढीसाठी शेततळ्यात रोहु,कटला अशा जातीचे मासे सोडुन मत्स्यपालन व्यवसाय करण्याचा सल्लाही कृषी दुतांनी यावेळी दिला़यात निखील शिंदे,संजय अकोलकर,अक्षय सावंत,सागर अकोलकर,गणेश सपाटे आदी कृषी दुतांचा समावेश होता़या कार्यशाळेसाठी संजय गाडेकर, गबाजी जपे,गोविंद गाडेकर,नवनाथ गाडेकर,वाल्मिक गाडेकर,संतोष गाडेकर आदी ग्रामस्थ उपस्थीत होते़या कार्यानुभव शाळेकरता प्राचार्य मांजरे,प्राध्यापक अनाप,जाधव आदींचे मार्गदर्शन होते़(तालुका प्रतिनिधी)-------------------------------------------------------------------------------------1015-2015-साई-01शेततळ्यांची पहाणी करतांना कृषीदुत,जेपीजे