पॅकेज अंमलबजावणीसाठी उच्चाधिकार समिती
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
नागपूर: दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.
पॅकेज अंमलबजावणीसाठी उच्चाधिकार समिती
नागपूर: दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.अर्थ, नियोजन, कृषी, जलसंपदा,जलसंधारण विभागाचे सचिव या समितीचे सदस्य असतील. ही समिती पॅकेजमधील योजनांचा नियमित आढावा घेईल व अंमलबजावणीतील अडचणी दूर करेल. मुख्यमंत्री दर महिन्याला या समितीच्या कामाचा आढावा घेतील, असे मुख्यमंत्री सचिवालयाकडून कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)