शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

चांदण्या रात्री ताजमहाल पाहण्यासाठी ई-तिकीट

By admin | Updated: August 23, 2015 03:41 IST

मूर्तिमंत प्रेमाचे प्रतीक असलेला आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ताजमहाल चांदण्या रात्री पर्यटकांना पाहता येणार असून, त्यासाठीची तिकिटे आॅनलाईन खरेदी करता येणार

आग्रा : मूर्तिमंत प्रेमाचे प्रतीक असलेला आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ताजमहाल चांदण्या रात्री पर्यटकांना पाहता येणार असून, त्यासाठीची तिकिटे आॅनलाईन खरेदी करता येणार आहेत. ही तिकिटे आधी बुकिंग करण्याऐवजी ज्या चांदण्या रात्री ताज पाहायचा आहे, त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाईन तिकीट खरेदी करता येणार आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी एका पत्रपरिषदेत येथे सांगितले की, याबाबतच्या एका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, लवकरच आदेश जारी करण्यात येईल.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या पर्यटकांना व्यक्तिगतरीत्या हजर राहून तिकीट खरेदी करावे लागते. चांदण्या रात्री ताज पाहण्याची वेळ रात्री ८.३० ते १२ वाजेपर्यंत असते. यासाठी प्रत्येक पर्यटकाला ३० मिनिटांचा वेळ दिलेला असतो. पौर्णिमेच्या आधीच्या दोन रात्री आणि नंतरच्या दोन रात्री म्हणजेच एकूण पाच रात्री ताज पाहता येतो. १७व्या शतकातील ताज पाहण्यासाठी पर्यटकांना पश्चिम दरवाजाने जाण्याची परवानगी देण्याचीही तयारी सुरू आहे. सध्या पूर्वेच्या दरवाजानेच पर्यटकांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे स्थानिक नागरिकांची अडचण होते. कारण त्यावेळी त्यांच्या येण्या-जाण्यावर बंधने येतात. ताजच्या मागील मेहताब बागही विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेथूनही पर्यटकांना ताज पाहता येऊ शकेल. (वृत्तसंस्था)ब्रिटिशकालीन झुंबर कोसळले..जगातील सात आश्चर्यांपैकी असलेल्या ताजमहालमधील ब्रिटिशकालीन झुंबर (दीपवृक्ष) कोसळले. त्याचे वजन ६० किलो असून ते सहा फूट उंच व चार फूट रुंद आहे. लॉर्ड कर्झन यांनी ते भेट दिले होते व १९०५मध्ये ते शाही द्वारावर लावण्यात आले होते. या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ते कोसळण्याचे कारण अद्याप पुढे आले नसले तरी खूप जुने असल्यामुळे ते कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. झुंबर कोसळले त्यावेळी तेथे कोणी नव्हते.