दुष्काळी समितीच्या बातमीचा जोड़़़़
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
़़़तर जनावरे कत्तलखान्यात जातील
दुष्काळी समितीच्या बातमीचा जोड़़़़
़़़तर जनावरे कत्तलखान्यात जातीलनगर तालुक्यातील भोरवाडी, अकोळनेर आणि सारोळा कसार परिसराची केंद्रीय पथकाने पाहणी केली़ या तिन्ही गावांत दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे़ परंतु गेल्या तीन वर्षांपासून पाऊस न झाल्याने या भागात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला़ गेल्या चाळीस वर्षातील हा सर्वात मोठा दुष्काळ आहे़ जनावरांना चारा नाही़ त्यामुळे गायी विकण्याची वेळ आली आहे़ पूर्वी ८० ते ९० हजार रुपयांना विकली जाणारी गाय दुष्काळामुळे २५ ते ३० हजार रुपयांत विकाली लागत असल्याचे यावेळी भोरवाडी येथील शेतकरी नानासाहेब गणपत जाधव यांनी निदर्शनास आणून दिले़ सरकारने चार्याची व्यवस्था न केल्यास ही जनावरे कत्तलखान्यात जातील आणि कसायला अच्छे दिन येतील, असे शेतकर्यांनी यावेळी सांगितले़ ़़़साहेब काही तरी मदत करा हो़़़़़़ पाथर्डी तालुक्यातील गावांची पाहणी करत असताना मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते़ वाड्या वस्त्यांवरील शेतकरी पथकात सहभागी होवून मागणी करत होते़ बहुतांशी ठिकाणी शेतकर्यांनी एकत्रित व्यथा मांडल्या़ सततच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ पिकांवर खर्च होतो, पण पाण्याअभावी तो वसूलही होत नाही, असे किती दिवस चालणार यावर काही तरी ठोस उपाय सरकारने काढावा, असाही एक सूर होता़ तर तीन वर्षांपासून दुष्काळाशी लढतो आहे़ पण पदरात काहीच पडत नसलेल्या हतबल झालेल्या शेतकर्यांनी हात जोडून साहेब काही तरी मदत करा हो,असे साकडेही त्यांनी घातल़े़़़़़़ ऑल इज गॉऩ़़केंद्रीय पथकाला मराठी भाषा समजत नव्हती़ त्यामुळे शेतकर्यांचे काय म्हणणे आहे, ते त्यांना समजत नव्हते़ जिल्हाधिकारी अनिल कवडे इंग्रजीतून शेतकर्यांची बाजू पथकासमोर मांडत होते़ काही शेतकर्यांनी मराठी येत नसलेले अधिकारी हवेतच कशाला? शेतकर्यांचे म्हणनेच त्यांना कळत नाही मग यांना दुष्काळ समजणार कसा? असा प्रश्नही युवकांनी उपस्थित केला़ कवडे यांच्याशी चर्चा करताना रथ यांनी या दुष्काळावर ऑल ईज गॉन, अशी प्रतिक्रिया दिली़ पिकांची खुंटलेली वाढ पाहून, अभी कोई उमीद नही है,असे रथ पाहणी दरम्यान म्हणाले़़़़़