शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

शरद नेरकर, नामपूर

शरद नेरकर, नामपूरनाशिक जिल्‘ातच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. दर महिन्यात पाऊस, दर महिन्याला गारपीट, वादळ या व अशा नैसर्गिक घटनांमुळे शेतकरी भांबावला आहे. निसर्गचक्र बदलल्याने शेती व्यवसायाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेती व्यवसायात आता बदल करावा तरी काय अशा संभ्रमावस्थेत शेतकरी दिसत आहे. शंभरी पूर्ण केलेल्या जुन्याजाणत्या वयस्क शेतकर्‍यांना असे भयानक वर्ष आठवत नाही. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रकच बदललेले दिसत आहे.डाळींब, द्राक्ष, ऊस, कांदा या पिकांसाठी नाशिक जिल्हा विशेष प्रसिद्ध. भगवा, लाल डाळींब ही जिल्‘ाच्या डाळिंबांची खासियत. डोळ्यात पाणी आणेल परंतु चवीला गुळचट असलेल्या नाशिकच्या कांद्याची विशेष प्रसिद्धी, तर चवीला गोड व तोंडात टाकल्यावर पाणी होईल यासाठी देश- विदेशात मागणी असणारी नाशिकची द्राक्षे व श्रम करून मेहनतीने ही पिके घेऊन मोठा झालेला आमचा बळीराजा. मात्र सध्याची निसर्गाची अवस्था बघून मनाने, मानाने व अर्थार्जनाने मोठा झालेला शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे. मनाने पुरता खचला आहे.द्राक्ष, कांदा, डाळींब ही पिके तशी बेभरवशाची. निसर्गाच्या अनुकूलतेवर यांचे अस्तित्व ठरते. द्राक्ष, कांदा ही पिके तर खूपच संवेदनशील. ढगाळ हवामानातील बदलामुळेसुद्धा ही पिके खराब होतात. यंदा दर महिन्यात पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानात वाढ होत आहे. पूर्वी केव्हातरी होणारी गारपीट ही नित्याची झाली आहे. ही गारपीट पिकांना मारक ठरते आहे. द्राक्षे काढणीला तयार होती. जिल्‘ातील निफाड, पिंपळगाव, मोसम, आरम या ठिकाणच्या द्राक्षबागांचे भावही ठरलेले होते. सौदेही झालेले होते. मात्र रात्रीतून गारपीट झाली. प्रचंड पाऊस झाला. निंबू, कांद्याच्या आकाराच्या गारा पडल्या. द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेथे पक्व झालेले डाळींब या गारपिटीने फुटले, तर फुलावर असलेला फुलांचा गळ झाला. शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. कुणी मुला, मुलींचे लग्न ठरवले होते, कुणाला घर बांधावयाचे होते, तर या पिकांवर कुणाला कर्जफेड करावयाची होती. प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने होती. मात्र या सर्व स्वप्नांचा क्षणात भंग झाला. हातात येणारा पैसा गारपिटीने हिरावून नेला.जोड आहे.