ड्रिपटेक सिंचन प्रणाली किफायतशीर
By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST
* चर्चासत्रातील सूरआजरा :अमेरिका येथील ड्रिपटेक कंपनीने ठिबक सिंचन प्रणालीचे चर्चासत्र करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील एम. डी. पाटील यांच्या शेतावर आयोजित केले होते.भारतामध्ये सर्वप्रथम लेजर आधारित ठिबक सिंचनप्रणाली असून उत्तम गुणवत्ता, कमी दरात, वापरणे व जोडणे अत्यंत सोपे, कमी दाबामध्ये सर्व रोपांना एकसारखे पाणी, छिद्रे बंद होण्याच्या त्रासापासू मुक्ती अशी ...
ड्रिपटेक सिंचन प्रणाली किफायतशीर
* चर्चासत्रातील सूरआजरा :अमेरिका येथील ड्रिपटेक कंपनीने ठिबक सिंचन प्रणालीचे चर्चासत्र करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील एम. डी. पाटील यांच्या शेतावर आयोजित केले होते.भारतामध्ये सर्वप्रथम लेजर आधारित ठिबक सिंचनप्रणाली असून उत्तम गुणवत्ता, कमी दरात, वापरणे व जोडणे अत्यंत सोपे, कमी दाबामध्ये सर्व रोपांना एकसारखे पाणी, छिद्रे बंद होण्याच्या त्रासापासू मुक्ती अशी वैशिष्यट्ये पुणे ठिबक सिंचन प्रणाली, अल्प भू-धारक व अत्यल्प भू-धारक शेतकर्यांसाठी कमी दाबावर कमी दरात अतिशय उपयुक्त व टिकावू व अतिशय किफायतशीर ठिबक सिंचन प्रणाली ड्रिपटेक कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे, असे राजू गवळी यांनी स्पष्ट केले.प्रथम करंबळी येथील ड्रिपटेक कंपनीचा ठिबक सिंचनप्रणाली वापरलेले शेतकरी एम. डी. पाटील. मारूती कांबळे यांनी ठिबक सिंचन वापर कसा किफायतशीर आहे हे स्पष्ट केले. यावेळी आजर्याचे उद्योगपती महादेव पोवार यांनीही मनोगत व्यक्त केले.चर्चासत्रप्रसंगी राजू गवळी, आजरा शेतकरी मंडळाचे उपाध्यक्ष संताजी सोले, दत्ता मगदूम, अशोक पोवार, जे. एन. देसाई उपस्थित होते. संदीप माळी यांनी सूत्रसंचलन केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)