गडमुडशिंगी गोसावी वस्तीत घाणीचे साम्राज्य
By admin | Updated: May 12, 2014 22:59 IST
उचगाव : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील गोसावी समाज वस्तीत घाणीचे साम्राज्य पसरले असून उघड्यावर नैसर्गिक विधीमुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे.
गडमुडशिंगी गोसावी वस्तीत घाणीचे साम्राज्य
उचगाव : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील गोसावी समाज वस्तीत घाणीचे साम्राज्य पसरले असून उघड्यावर नैसर्गिक विधीमुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे.या वस्तीत रस्त्याचे डांबरीकरण झाले, आता तर नवीन पाईपलाईन टाकून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. दुसर्या गल्लीतही डांबरीकरण होणार आहे. रस्त्याच्या गटर्सचे बांधकामही करण्यात येणार आहे. पाईपलाईन खुदाई झाल्याने रस्त्यालगतची गटर्स बुजली गेली आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदर गटर्सचे बांधकाम व्हावे तसेच येथील कचर्यांचे ढीग उचलण्यात यावेत. ग्रामपंचायतीने कचर्यांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.