व्यसनी मुलाची आईने केली हत्या डोंबिवलीतील घटना
By admin | Updated: August 6, 2015 22:08 IST
डोंबिवली : दारूच्या व्यसनासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणार्या मुलाची आईने गळा आवळून हत्या केल्याची घटना पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अशोक हिरालाल चौधरी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी त्याची आई प्यारी चौधरी हिस विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
व्यसनी मुलाची आईने केली हत्या डोंबिवलीतील घटना
डोंबिवली : दारूच्या व्यसनासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणार्या मुलाची आईने गळा आवळून हत्या केल्याची घटना पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अशोक हिरालाल चौधरी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी त्याची आई प्यारी चौधरी हिस विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.पार्वती निवास येथे राहणार्या अशोकला गांजा आणि दारूचे व्यसन जडले होते. व्यसन करण्यासाठी तो दररोज आई आणि मोठा भाऊ दिनेश यांच्याकडे पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास तो दोघांनाही मारहाण करायचा. व्यसनाच्या आहारी गेलेल्या अशोकने एकदा आईचे दागिने विकले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी त्याची आई घरात एकटी असताना नशा क रून आलेल्या अशोकने तिच्याकडे व्यसनासाठी आणि मोटारसायकल दुरुस्तीसाठी हजार रुपयांची मागणी केली. परंतु, पैसे नसल्याने आईने ते देण्यास नकार दिला. याचा राग त्याला आल्याने त्याने तिला बेदम मारहाण केली. थोड्या वेळाने तो घरातच झोपी गेला. दरम्यान, या रोजच्या त्रासाला कंटाळून आईने अखेर झोपेत असलेल्या अशोकचा कॉम्प्युटरसाठी वापरल्या जाणार्या वायरने गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)--------------------------------