पोस्टवाड्या वरील रस्त्यावर धोकादायक खड्डा
By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST
होंडा : येथील पोस्तवाडा, वडाकडे जंक्शनच्या जवळ रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्डय़ामुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. सदर खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
पोस्टवाड्या वरील रस्त्यावर धोकादायक खड्डा
होंडा : येथील पोस्तवाडा, वडाकडे जंक्शनच्या जवळ रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्डय़ामुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. सदर खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. हा खड्डा वाळपई-होंडा रस्त्या दरम्यान डाव्याबाजूला असून प्रमुख रस्त्यावर असलेल्या या खड्डय़ाच्या वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने आतापर्यंत बरेच अपघात घडले आहे. त्या खड्डय़ाचा दुचाकी चालकांना जास्त त्रास होत आहे. सदर खड्डय़ात पावसाचे पाणी साचून असल्याने तेथे धोका आणखीन वाढला आहे. या ठिकाणी असलेला खड्डा हा प्रमुख रस्त्यावर असून सुद्धा संबंधित यंत्रणेला काय दृष्टीस पडला नाही, असा प्रश्न वाहन चालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.