सिंधी मंदिरात गर्दी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
श्रीरामपूर : शहरातील सिंधी मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधी मंदिरात गर्दी
श्रीरामपूर : शहरातील सिंधी मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बबलू दुगल मित्रमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी १ वाजता सरबत व खिचडी वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, नगरसेवक रविंद्र गुलाटी, राजेश अलघ, मुन्ना पठाण, सचिन गुजर, सिध्दार्थ मुरकुटे, लकी सेठी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधी मंदिराचे प्रमुख राम आहुजा, मंदिराचे सेवेकरी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)-------------कोल्हारला मिरवणूक कोल्हार : महाशिवरात्रीनिमित्त येथील ग्रामदैवत श्रीकोल्हाळेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे मंदिर पुजार्यांनी अभिषेक केला. सकाळी आठपासून भाविकांच्या रांगा वाढू लागल्या. युवक कार्यकर्ते स्वप्नील निबे यांच्या सामाजिक प्रतिष्ठानतर्फे भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. रात्री महादेवाचा छबिना पालखीची मिरवणूक काढण्यात आली.