शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या सुरक्षेची पर्यावरण मंत्रालयाला चिंता

By admin | Updated: April 29, 2016 05:17 IST

पर्यावरण मंत्रालयाने आता खासदारांच्या सहकार्याने या वन्यजीवाचा बचाव, संरक्षण आणि उत्कृष्ट साधनांसाठी मोहीम सुरू केली आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- वाघांच्या नामशेष होत चाललेल्या प्रजातींमुळे चिंतित पर्यावरण मंत्रालयाने आता खासदारांच्या सहकार्याने या वन्यजीवाचा बचाव, संरक्षण आणि उत्कृष्ट साधनांसाठी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गतच बुधवारी मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत सखोल विचारविनिमय झाला. यावेळी उपस्थित खासदार विजय दर्डा यांनी वाघांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उलचण्याची गरज व्यक्तकेली.पेंच व्याघ्र प्रकल्पातील लोकवस्त्या अन्यत्र हलविण्याची गरज आहे. कारण त्यांचा विपरीत परिणात होत आहे. याशिवाय याच क्षेत्रातील तोतलाडोह जलाशयात मासेमारी सुरूच असून सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यावरही परिस्थिती बदललेली नाही. हा प्रकार थांबविणे आवश्यक आहे, असा सल्ला दर्डा यांनीदिला. त्यांचे असे म्हणणे होते की, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रादरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग-७ चारपदरी केल्याने वाघांच्या कॉरिडोरला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाघ आणि इतर वन्यजीवांना सुरक्षित हालचाली करता याव्यात या दृष्टीने येथे भूयारी मार्ग अथवा उड्डाण पुलासारखा पर्याय वापरला जाऊ शकतो.विजय दर्डा यांनी स्पेशल टायगर फोर्समधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही उपस्थित केला. केंद्र सरकार आपल्या हिस्स्याचा निधी देत नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असे ते म्हणाले. वाघांच्या अवैध शिकारींकडे लक्ष वेधून त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेसे उपाय करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची चर्चा करताना खा.दर्डा यांनी वाघांचे दर्शन होणाऱ्या मार्गांचा उल्लेख केला. सोबतच पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवे मार्ग शोधण्याचा सल्ला दिला. >ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पाकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, तेथे कडक सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे. कारण जानेवारी २०१५ पासून आतापर्यत १३ पेक्षा जास्त वाघांची शिकार झाली आहे. काही वाघांचा मृत्यू टेरिटोरियल विंगच्या आत झाला आहे. हे क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारितील असल्याने कोर क्षेत्राच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा बंदोबस्त केला जावा. >त्यांनी कोर एरियातील २० टक्के क्षेत्र पर्यटनासाठी खुले करण्यावरही भर दिला. सोबतच जिप्सी चालकांवर टाकण्यात येणार दबाव कमी करण्याची मागणी केली. पर्यटनाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रांमध्ये रिसोर्ट सुरू केले जावेत असे त्यांचे मत होते.सुरक्षेसाठी ड्रोनच्या वापरासंबंधी सूचनेची बैठकीला उपस्थित इतर सदस्यांनी भरपूर प्रशंसा केली.