बीएड कॉलेजच्या भरती प्रक्रियेबाबत घोळ
By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST
बीएड कॉलेजच्या भरती प्रक्रियेबाबत घोळ
बीएड कॉलेजच्या भरती प्रक्रियेबाबत घोळ
बीएड कॉलेजच्या भरती प्रक्रियेबाबत घोळयुनायटेड गोवन्सचा आरोपपणजी : राज्यातील निर्मला संस्था, पी.ई.एस कॉलेज आणि बी. एड कॉलेजधील जागा कमी करण्यात आल्या आहेत़ तसेच इतर कॉलेजपेक्षा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्या मतदारसंघात नव्याने सुरु केलेल्या बी.एड कॉलेजमध्ये सुटसुटीत प्रवेश प्रक्रिया तसेच सुविधा सरकारने उपलब्ध केल्या आहेत. पार्सेकर यांच्या सोबत उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भास्कर नायकही या घोटाळय़ात समील आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दक्षता विभागाकडे केल्याचे सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.मुख्यमंत्री पार्सेकर यांनी स्वत: कॉलेज उघडले असून या कॉलेजसाठी विद्यार्थी मिळावेत म्हणून इतर बी.एड कॉलेज मधील जागा कमी करण्यात आल्या आहेत. तसेच नियामंमध्येही बदल करण्यात आले असल्याचे अँड. अविनाश तावारिस यांनी सांगितले. इतर कॉलेजमध्ये बी.ए करुन बीएड करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो मात्र पार्सेकर यांच्या कॉलेजमध्ये चार वर्षात बी.एड करता येते. काही विद्यालयात इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी किमान 800 गुण दर्शविण्यात आले आहेत तर ऑनलाईन प्रवेश करताना 1300 गुण असावेत असे सूचविण्यात आले आहे. यंदा प्रवेशाची प्रक्रियाही बदलण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्यच खचले आहे, असे युनायटेड गोवन्सचे अँड. अविनाश तावारिस यांनी सांगितले. भास्कर नायक यांनी सदर विद्यालयांच्या नियमावली बदलण्यासाठी पार्सेकर यांना मदत केली आहे. पार्सेकर यांनी या प्रकरणी आपल्या पक्षाचेच नियम धाब्यावर बसवले आहेत. तसेच राज्यात भाषा सुरक्षा, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षिका इत्यादी विषय सुरु असताना पार्सेकर हे स्वत:च्या कॉलेजच्या कल्याणाकडे लक्ष ठेवून आहेत. यासाठी ते सत्तेचा व पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप तावारिस यांनी केला आहे. याबाबत दक्षता खात्याकडे तक्रार करण्यात आली असून मुख्यमंत्री पार्सेकर व नायक यांची या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी तावारिस यांनी केली आहे.