अंनिसच्या बातमीला चौकटी
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
चौकटदेशात कायदा लागू होण्यासाठी प्रयत्नमहाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाल्यानंतर तो संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी अनेक राज्यांमधून प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्नाटक, केरळ, पंजाब या काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना त्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे............चौकटतपासासाठी प्लँचेट करणार्यांवर कारवाई नाहीचडॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी ...
अंनिसच्या बातमीला चौकटी
चौकटदेशात कायदा लागू होण्यासाठी प्रयत्नमहाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाल्यानंतर तो संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी अनेक राज्यांमधून प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्नाटक, केरळ, पंजाब या काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना त्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे............चौकटतपासासाठी प्लँचेट करणार्यांवर कारवाई नाहीचडॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेटचा वापर केल्याची धक्कादायक बाब स्टिंग ऑपरेशनव्दारे उजेडात आली. दाभोलकरांनी त्यांचे आयुष्य प्लॅंचेट सारखे प्रकार बंद व्हावेत म्हणून खर्ची घातले त्यांच्या खुनाचा तपास करताना असा प्रकार होणे ही पोलीस दलासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब होती. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली मात्र दोषींवर शासनाने अद्याप काहीच कारवाई केली नाही. दाभोलकरांच्या मारेकर्यांना दोन वर्षात पकडू न शकणार्या राज्य शासनाला किमान एवढे तरी करता येणे शक्य होते तेही त्यांनी केले नाही...................