शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

लोकसभेत भाजपचा काँग्रेसला दुसरा धक्का ?

By admin | Updated: July 10, 2014 09:49 IST

काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्षपदही द्यायचे नाही अशी तयारी भाजपने केली असून यात भाजपला यश आल्यास १९९१ पासून सुरु असलेली ही परंपरा संपुष्टात येणार आहे.

 
ऑनालइन टीम
नवी दिल्ली, दि. १०- सत्ताधारी भाजपच्या रणनितीमुळे विरोधीपक्ष नेतेपदापासून दूर असलेल्या काँग्रेसला लोकसभेत आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्षपदही द्यायचे नाही अशी तयारी भाजपने केली असून यात भाजपला यश आल्यास १९९१ पासून सुरु असलेली ही परंपरा संपुष्टात येणार आहे. 
लोकसभेतील उपाध्यक्षपदासाठी अद्याप निवडप्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. या पदासाठी फारसे कठोर नियमही नाहीत. लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्यायचा असा एक पायंडा आहे. हा निर्णय प्रामुख्याने राजकीय समीकरण आणि पक्षाचे संख्याबळ यावर अवलंबून असतो. मात्र १६ व्या लोकसभेतील उपाध्यक्ष पद काँग्रेसला द्यायचे नाही असा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसकडे लोकसभेत अवघे ४४ खासदारांचे बळ असून त्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेला आकडाही गाठता आलेला नाही. याच संधीचा फायदा घेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद आणि लोकसभा उपाध्यक्षपद या दोन्ही महत्त्वांच्या पदापासून दूरच ठेवायचे अशी रणनिती भाजपने आखल्याचे समजते. तृणमूल काँग्रेस, एआयएडीएमके आणि बिजू जनता दल या पक्षांच्या युतीकडे ९० खासदारांचे पाठबळ आहे.  हे तिन्ही पक्ष लोकसभेतील कामकाजात काँग्रेसपासून लांब राहणेच पसंत करतात. तर काँग्रेसप्रणीत युपीएकडे ६० खासदार आहेत. अशा स्थितीत गैरकाँग्रेसी पक्षालाच लोकसभा उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
दरम्यान, १४ व्या आणि १५ व्या लोकसभेत तत्कालीन युपीए सरकारने लोकसभा उपाध्यक्षपद भाजपप्रणीत एनडीएला दिले होते. त्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात काँग्रेसकडे तर नरसिंह राव यांच्या कार्यकाळात भाजपकडे हे पद देण्यात आले होते. तर १९८४ -८९ या कालावधीत राजीव गांधींनी मित्रपक्ष एआयडीएमकेला लोकसभा उपाध्यक्षपद दिले होते.