रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
पिण्यासाठी पाणी, स्वच्छता आणि ग्रामीण भागातील कौशल्याचा विकास करण्यासाठी बिल गेटस् फाऊंडेशन केंद्रीय ग्रामविकास मंत्रलयाला मदत करणार आहे. मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बिल गेटस् यांनी केंद्रीय ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांची शुक्रवारी सकाळी भेट घेतली. तब्बल तासभर या दोघांची ग्रामीण विकासावर चर्चा झाली. यावेळी बिल यांच्या पत्नी मिलिंडा व गडकरी यांच्या पत्नी कांचन उपस्थित होत्या.
गडकरींच्या कार्यशैलीबद्दल आपण जाणून आहोत. त्यांच्यासारख्या नेत्यांची गरज जगाला आहे. त्यांना आदरातीथ्याबद्दल जेवढी जाण आहे, त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांना ग्रामीण जीवनाबद्दल असलेली आस्था, ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून सुरू असलेली धडपड लक्षवेधक आहे. आम्ही अनेकदा भारतात आलो; पण आज गडकरींच्या धडाडीचा परिचय सुखावून गेला, अशा शब्दांत बिल व मिलिंडा यांनी माध्यमांना सांगितले. तर गडकरी म्हणाले, हे दाम्पत्य अत्यंत संवेदनशील आहे. त्यांना फाउंडेशनच्या माध्यमातून भारतात लोकोपयोगी काम करायचे आहे. सरकार त्यांना पूर्ण मदत करेल. त्यांना ग्रामीण योजनांची पूर्ण माहिती आपण दिली आहे. त्यातील काही योजनांवर ते काम करतील असे ते म्हणाले. जिथे अडेल तिथे आपण ‘राजदूत’ समजून स्वत: लक्ष घालू. पहिल्या टप्प्यात स्वच्छता, पिण्याचे पाणी, हातमाग व हँडिक्राफ्ट या विषयांवर आम्ही लक्ष केंद्रित करू.’
गडकरी यांच्या निवासस्थानी सकाळी सव्वानऊ वाजता गेटस् त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले
होते.
सरकारला शंभर दिवस झाल्याने त्यांनी गडकरींचे अभिनंदन केले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम व ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या ग्रामीण भागातील कौशल्य व नैपुण्याला चालना मिळावी म्हणून तयार होत असलेल्या ‘बँक ऑफ आयडिया’च्या ‘इंडिया इनोवेशन फाऊंडेशन’ची माहिती दिली. बिल यांना ती खूप आवडली. ते म्हणाले, अशा चौकटीबाहेरील कल्पनांना सोबत काम करून मूर्तरूप देऊ.’
गडकरी यांनी पुराचे व्यवस्थापन, हवेतून पाण्याची निर्मिती, स्वच्छतेसाठी नव्या तंत्रची तयारी, गंगा प्रकल्प, आदिवासींसाठी रोजगार, नक्षल्यांचे विकासात येणारे अडथळे याबाबतची माहिती दिली. दूषित पाण्यामुळे होणा:या आजारातून लोकांची सुटका करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यावर लक्ष वेधले. गडकरींनी बांबूची ब्रिफकेस बिल यांना तर मिलिंडा यांना भंडा:याची कोसा साडी कांचन गडकरी यांनी भेट दिली.
4गेटस् -भारतात स्वच्छतेवर खूप खर्च होतो, पण त्याचा फार उपयोग लोक घेत नाही, असे आपले निरीक्षण आहे.
4गडकरी- लोकशिक्षणाची गरज आहे. लोकचळवळीशिवाय शक्य नाही. येत्या 2 ऑक्टोबरपासून ही सुरुवात देशात होत आहे.
4गेटस् - फोकस कशावर असेल?
4गडकरी- दूषित पाण्यातून होणारे आजार नष्ट करण्यावर.
4गेटस् - तुमचे स्वप्न काय आहे?
4गडकरी- गरिबाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. जिथे शेतक:यांच्या आत्महत्या होतात, त्या भागातून मी आलेलो असल्याने मला दु:ख ठाऊक आहे. त्यामुळे आयुष्य लोकांच्या विकासासाठीच आहे.
4गेटस्- काय अडचणी येतात?
4गडकरी- दुर्दैवाने आमच्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्यामुळे त्यांनी बनविलेले कायदे अजूनही अडवणूक करतात.
4गडकरी आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी गेटस् दाम्पत्यासाठी दही-मिसळ, पोहे, मक्याचे वडे आणि ज्यूस असा मेन्यू ठरविला होता.
4कांचन गडकरी यांनी स्वत: हे पदार्थ तयार केले. मिलिंडा यांना ते फार आवडले तर बिल यांनी हे पदार्थ लज्जतदार आहेत असे म्हटले.
4 विशेष म्हणजे, पदार्थाची प्रशंसा मिलिंडा यांनी माध्यमापुढेही केली.
4ताडोबा अभयारण्यात 35क् वाघ आहेत. पाच फुटांवरून ते पाहता येतात. यामुळे विदर्भाला वाघांची राजधानी म्हणतात. तिथे आपण या, असे गडकरी यांनी दोघांनाही म्हटले तेव्हा बिल नाही आले, तरी मी नक्की येईल, असे मिलिंडा म्हणाल्या. तेव्हा बिल म्हणाले, मी वाघाला नाही घाबरत.! आम्ही नागपूरला पण येऊ आणि वाघ पाहायलासुद्धा..!