कुत्र्यांच्या हल्ल्यात बंदराचा मृत्यू
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
कुत्र्यांच्या हल्ल्यात बंदराचा मृत्यू नागपूर : वायुसेनानगर तेलंखेडी परिसरात शनिवारी सायंकाळी एका तीन वर्षाच्या बंदरावर कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान बंदराचा मृत्यू झाला. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी ४ वाजता वायुसेनानगरात चार ते पाच कुत्रे मिळून एका बंदरावर तुटून पडले. या हल्ल्यात बंदर गंभीर जखमी ...
कुत्र्यांच्या हल्ल्यात बंदराचा मृत्यू
कुत्र्यांच्या हल्ल्यात बंदराचा मृत्यू नागपूर : वायुसेनानगर तेलंखेडी परिसरात शनिवारी सायंकाळी एका तीन वर्षाच्या बंदरावर कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान बंदराचा मृत्यू झाला. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी ४ वाजता वायुसेनानगरात चार ते पाच कुत्रे मिळून एका बंदरावर तुटून पडले. या हल्ल्यात बंदर गंभीर जखमी झाला. वन विभागाच्या रेस्क्यू चमूने जखमी बंदराला उपचारासाठी व्हेटरनरी रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान बंदराचा मृत्यू झाला.