वाघाच्या अवयवांसह तरुणाला अटक
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
वाघाच्या अवयवांसह तरुणाला अटक
वाघाच्या अवयवांसह तरुणाला अटक
वाघाच्या अवयवांसह तरुणाला अटकतस्करीची शक्यता : मोठे मासे हाती लागण्याची अपेक्षाचंद्रपूर : मध्यचांदा वनपरिक्षेत्र बल्लारपूर येथील वनअधिकार्यांनी सोमवारी रात्री उशिरा घातलेल्या धाडीत वाघाची शिकार करून त्याच्या अवयवाची तस्करी करण्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. सुनील पून (४२) याला अटक करण्यात आली आहे़ चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सोमवारी रात्री १० च्या सुमारास वनविभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. पून याच्याकडून वाघाची कातडी, हाडांसह अन्य साहित्य जप्त केले आहे. पून याच्याकडून कातडी, तसेच हाडाचे तुकडे, वाघाचे डोके, पंजे, नख अवशेष हस्तगत करण्यात आले. मंगळवारी पून याला न्यायालयात हजर केले असता २१ फेबुवारीपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (जिल्हा प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़बॉक्सअशी झाली कारवाईसुनील पून याच्याकडे वाघाचे अवयव असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यावरून सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक तयार करून एका इंडिका वाहनाने त्याला विसापूरला पाठविण्यात आले. तिथे आरोपीने वाघाच्या अवयवांचे काही सम्पल ग्राहकाला दाखविले. ठराविक रकमेत सौदा ठरल्यावर त्याच वाहनात बसून सुनील पुन चंद्रपुरात आला. आधीच ठरल्यानुसार वरोरा नाका चौकात हे वाहन अडवून आरोपीला अटक करण्यात आली. यात चार व्यक्त सहभागी होते. तिघे फरार आहेत.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़17ूस्रस्रँ31जप्त करण्यात आलेले वाघाचे अवयव