बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी या बातमीचा जोड
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
बॉक्स आयटम
बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी या बातमीचा जोड
बॉक्स आयटम'बागलाणच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतकर्यांचे लाखो रुपयांचे पशुधन पशुवैद्यकीय सेवेअभावी संकटात सापडत आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून बागलाणमध्ये पशुवैद्यकीय अधिकार्याची पदे रिक्त असून, प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही संबंधितांकडून यांची गंभीर दखल घेतली जात नाही. आगामी काळात या भागातील पशुधनावर संकट ओढवल्यास त्यास संबंधित विभागच जबाबदार राहील.सौ. सिंधूताई सोनवणेजि.प. सदस्य, पठावे दिगर.'बागलाणमधील पशुधनाबाबत संबंधित विभाग गंभीर नसून वेळोवेळी माझे स्वत:चे लाखो रुपयांचे पशुधन दगावल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पशुवैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करून शेतकर्यांचे होणारे नुकसान थांबवावे.- गोविंद चिंचोरेपशुपालक व दुग्धव्यावसायिक शेतकरी