शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

युवकाच्या मृत्यूनंतर हॉस्पिसियोत रणकंदन

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

संतप्त जमावाचा हल्लाबोल : तावदाने फोडली, खुच्र्यांची मोडतोड, मुख्य रस्ता अडविला, अज्ञातांविरुद्ध गुन्हा

संतप्त जमावाचा हल्लाबोल : तावदाने फोडली, खुच्र्यांची मोडतोड, मुख्य रस्ता अडविला, अज्ञातांविरुद्ध गुन्हा
मडगाव : छातीत दुखत असल्याने उपचारासाठी हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केलेल्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने खवळलेल्या त्याच्या मित्रांनी हॉस्पिसियो इस्पितळात रणकंदन केले. डॉक्टरांनी उपचार करण्याची तसदी न घेतल्याने आपला मित्र मरण पावल्याचा दावा करत या युवकांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनची तावदाने फोडली व खुच्र्यांचीही मोडतोड केली. त्यानंतर मुख्य रस्त्यावर ठाण मांडून वाहतूकही अडवून धरली. खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिसियोच्या आवाराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते.
अकबर गाझी असे मयताचे नाव असून तो कोलवा येथील रहिवासी आहे. मयत कुडतरी येथे जीम इन्स्ट्रक्टर म्हणून व्यवसाय करत होता. हॉस्पिसियोत दाखल झाल्यानंतर आपण दुसर्‍या एका खासगी इस्पितळात उपचार करण्यासाठी जात असल्याचे सांगून त्याने हॉस्पिसियोत उपचार करून घेण्यास नकार दिला होता. वैद्यकीय कागदपत्रावर तसा स्पष्ट उल्लेख आहे. मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत नेण्यात आला असून चिकित्सा अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मडगाव पोलिसांनी हॉस्पिसियो इस्पितळाची तावदाने फोडल्याप्रकरणात अज्ञातांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, कलम 3, तसेच भादंसंच्या 143 व 149 कलमांखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिली. मायणा-कुडतरी पोलिसांनी तूर्त अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे.
मृत युवकाची कुडतरी येथे व्यायाम शाळा असून उपलब्ध माहितीप्रमाणे, मंगळवारी रात्री तो जीममध्येच होता. सकाळी व्यायाम करत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याच्या मित्रांनी त्याला सकाळी 6.15 वाजता हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेऊन त्याच्यावर प्रथमोपचारही केले. त्यानंतर त्याने आपण खासगी इस्पितळात उपचारांसाठी जातो, असे सांगून ईसीजी काढून घेण्यासही नकार दिला. वैद्यकीय कागदपत्रावर त्याच्या एका निकटवर्तीयाने या रुग्णाला दुसरीकडे उपचारांसाठी नेत असल्याचे लिहून दिल्याने 7.15 वाजण्याच्या सुमारास त्याला हॉस्पिसियोतून डिस्चार्ज देण्यात आला. वॉर्डच्या बाहेर निघताना साडेसात वाजण्याच्या सुमारास अकबर गाझी हा अचानक खाली कोसळला व तेथेच त्याचा मृत्यू झाला.
अकबरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे मित्र हॉस्पिसियो इस्पितळात जमा झाले. डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, मडगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन युवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.
हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक सी. गोम्स या काही कारणास्तव सकाळी उपलब्ध नसल्याने अधीक्षकपदाचा ताबा डॉ. अविनाश पुजारी यांच्याकडे होता. दुपारनंतर त्या पुन्हा आपल्या कामावर रुजू झाल्या. दुपारी जमावाने डॉ. पुजारी यांना लक्ष्य बनविले. अधीक्षकांच्या केबिनची तावदाने फोडली व खुच्र्यांची मोडतोड केली. या घटनेत जमावापैकी फैझ किल्लेदार हा जखमी झाल्याने हॉस्पिसियोत त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर संतप्त युवकांच्या जमावाने हॉस्पिसियोच्या आवाराबाहेरील रस्त्यावर ठाण मांडून वाहतूकही अडविली. दुपारची वेळ असल्याने लोकांचे हाल झाले. रस्ता अडविणार्‍या युवकांची लोकांशी शाब्दिक बाचाबाचीही झाली. मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी रस्त्यावर बसलेल्यांना कडक शब्दांत ताकीद दिल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
दरम्यान, दुपारी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी हॉस्पिसियोत जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. गुरुवारी आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना बोलावून घेऊ, असे आश्वासनही संबंधितांना दिले. तत्पूर्वी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, तसेच उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर हेही घटनास्थळी येऊन गेले.
जिल्हाधिकार्‍यांनी त्रिसदस्यीय मंडळ नेमून अकबर याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी जमावातील युवकांनी केली. (प्रतिनिधी)

ढँ3 : 2608-टअफ-11
कॅप्शन: मृत अकबर गाझी.
ढँ3 : 2608-टअफ-12
कॅप्शन: हॉस्पिसियोसमोरील मुख्य रस्ता अडविल्याने वाहतूक ठप्प झाली. (छाया: पिनाक कल्लोळी)
ढँ3 : 2608-टअफ-13
कॅप्शन: शोकाकूल अवस्थेत मृतदेहासमोर जमलेले मृताचे नातेवाईक. (छाया: अरविंद टेंगसे)
ढँ3 : 2608-टअफ-14
कॅप्शन: हॉस्पिसियोतील वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनची तावदाने, तसेच खुच्र्यांची जमावाने नासधूस केली. (छाया: पिनाक कल्लोळी)
ढँ3 : 2608-टअफ-15
कॅप्शन: जमावाला समजावण्याच्या प्रयत्नात मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील. (छाया: पिनाक कल्लोळी)
ढँ3 : 2608-टअफ-16
कॅप्शन: सायंकाळी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक सी. गोम्स यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. या वेळी उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर हेही उपस्थित होते. (छाया: पिनाक कल्लोळी)