१८ धरणे आंदोलन
By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST
आदिवासी कुटुंब कल्याण समिती
१८ धरणे आंदोलन
आदिवासी कुटुंब कल्याण समितीनागपूर : आदिवासी संस्थेच्या श्री कल्यासूर जैतूर पेरसापेनला मंजुरी देण्यात यावी यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी कुटुंब कल्याण समिती देवस्थान वडगाव (ता. कळंब)च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. प्रमुख मागण्या : माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी बंद केलेले महाविद्यालय श्री प्रभू जैतूर पेरसापेनला जोडण्यात यावे, संस्थेच्या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात यावी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आदी मागण्यांचा समावेश आहे. नेतृत्व : समितीचे अध्यद्यक्ष हरिदास मसराम कार्यकर्ते : चरणदास चांदेकर, किशोर मोहरकर, नारायण चरडे, देवका नाल्हे, कांता तिरणकर, शांता आत्राम, अशोक मसराम, कमलाकर तिरणकर, अशोक मडावी आदी.लोकस्वराज्य आंदोलननागपूर : क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, मातंग समाजाच्या ६८ शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलनतर्फे हिवाळी अधिवेशनानिमित्त आमरण उपोषण करण्यात येत आहे.प्रमुख मागण्या : मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जातीच्या यादीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून सर्व अनुसूचित जाती समूहांना न्याय देण्यात यावा, मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यात यावा, शिक्षण, आरोग्य, घरकुल, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदी मूलभूत सोयी पुरविण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश आहे.उपोषणकर्ते : संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे कार्यकर्ते : नामदेव गायकवाड, सुनील गायकवाड, रणजित झोंबाडे, साहेबराव डोंगरे आदी. अन्यायग्रस्त कर्मचारी संघर्ष समिती, बुलडाणा जिल्हा नागपूर : बुलडाणा जिल्हा परिषदमधील शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अन्यायग्रस्त कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त साखळी उपोषण सुरू केले आहे.प्रमुख मागण्या : १९९५ ला निवड व नियुक्ती झालेल्या बुलडाणा जिल्हा परिषदमधील शिक्षकांना शासन निर्णय १५ जून १९९५ चा लाभ देऊन पूर्ववत सेवेत सामावून घेतले जावे, १५ जून १९९५ च्या शासन निर्णयाची व्याप्ती वाढविण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.नेतृत्व : संघटनेचे अध्यक्ष बळीराम तायडे कार्यकर्ते : सुनील इंगळे, अंबादास खिरडकर, समाधान पवार, रमेश कडू, उमेश राणे, विश्वजित वरकडे, शैलेश पराते, चंद्रकांत सुरोळकर, संजय कावळे आदी.