नाशिक : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा २०२० या वर्षाचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार नाशिकचे युवा साहित्यिक, नाटककार प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळी’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
प्राजक्त यांचे ‘संगीत देवबाभळी’ हे नाटकही फार लोकप्रिय ठरले आहे. संतश्रेष्ठ तुकारामांच्या पत्नी आवलीच्या पायातला काटा विठ्ठलाने काढला, या आख्यायिकेचा आधार घेऊन प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला नाट्यप्रेमी रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. या पुस्तकाला देखील १५ हून अधिक पुरस्कारांनी यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. सन्मानस्वरूप ताम्रपत्र आणि ५० हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांतर्गत मराठी सोबतच बंगाली साहित्यासाठीचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. बंगाली लेखक श्याम बंदोपाध्याय यांच्या ‘पुराणपुरुष’ या पुस्तकासाठी त्यांना हाच युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
फोटो
२६देवबाभळी
२६प्राजक्त देशमुख