नाशिक : दिवाळी सणाच्या आनंदपर्वात आज रुग्णालयांत, तसेच घरोघरी आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. शनिवारी वसूबारस पूजनाने दिवाळी सणाला प्रारंभ झाला. सोमवारी धन्वंतरीचे विधिवत पूजन केले जाते. परंपरेनुसार या दिवशी नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून घरात त्याची पूजा केली जाते. सायंकाळी दीपप्रज्वलन करून घर तसेच दुकानाचेदेखील पूजन केले जाते. घरासमोर बाग तसेच तलाव, विहीर येथे दिवा लावण्याचीदेखील प्रथा आहे.धन्वंतरी पूजनाचे औचित्य साधून गृहिणींनी दागिन्यांची, तसेच गृहोपयोगी साहित्याची खरेदी करून त्याचे पूजन केले. या दिवशी विशेषत्वाने व्यवसायाच्या ठिकाणी पूजन केले जाते. वैद्यकीय व्यावयासिक आपल्या रुग्णालयातील साहित्यांचे पूजन करून रुग्णांसाठी आरोग्याची प्रार्थना करतात. धन्वंतरी ही आरोग्याची देवता मानली जात असल्याने वैद्यकीय व्यावसायिक मनोभावे धन्वंतरी मूर्तीचे पूजन करतात.
घरोघरी धन्वंतरीचे पूजन
By admin | Updated: November 9, 2015 21:52 IST