शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या बहिष्काराने काय साधले?

By admin | Updated: November 4, 2015 23:45 IST

लोकप्रतिनिधींच्या बहिष्काराने काय साधले?

नाशिक : जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविल्याने गेल्या तीन दिवसांपासून सर्वपक्षीय कृती समितीने हाती घेतलेल्या आंदोलनापासून प्रशासनाला मुक्ती मिळाली असली तरी, जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या मंगळवारच्या बैठकीवर लोकप्रतिनिधींनी टाकलेल्या बहिष्कारामुळे काय साधले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकीकडे पाणी सोडण्याच्या विरोधात मध्यरात्रीपर्यंत आंदोलने करायची, अधिकाऱ्यांना घेराव घालून वेठीस धरायचे व दुसरीकडे शासनदरबारी बाजू मांडण्याची आयतीच संधी मिळत असताना त्यापासून दूर पळायचे या लोकप्रतिनिधींच्या दुहेरी नीतीचा उलगडा होऊ शकलेला नाही. जायकवाडीसाठी नाशिक-नगरमधून १२.८६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला व त्याला उच्च न्यायालय तसेच सर्र्वाेच्च न्यायालयात नगर-नाशिककरांनी आव्हानही दिले. त्यात जायकवाडी धरणात सध्या उपलब्ध असलेला साठा व नगर-नाशिकमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे जमा होणारे अतिरिक्त पाण्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. जायकवाडीसाठी सोडले जाणारे पाणी पिण्यासाठी, सिंचन व नंतर उद्योगासाठी वापरण्यात येणार असल्याचे अगोदर न्यायालयासमोर कबूल करण्यात आले, त्याला नगर-नाशिकने विरोध केल्यानंतर न्यायालयाने जायकवाडीत फक्त पिण्यासाठी पाणी सोडा असे आदेश दिले व हेच आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम केले. मुळात जायकवाडीत पिण्यासाठी किती पाणी लागेल व नगर-नाशिकमधून त्यासाठी किती पाणी सोडायचे याबाबत न्यायालयाचे आदेश संदिग्ध राहिले. परिणामी पाटबंधारे खात्याने १२.८४ टीएमसी पाणी सोडण्यावर आपला निर्णय कायम ठेवला. जायकवाडीत सध्या असलेल्या पाणीसाठ्यातून त्यांची पिण्याची तहान भागविली जाऊ शकते हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत असले तरी, जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यावर ठाम राहिलेल्या जलसंपदा विभागाला चाप लावण्यासाठी आता फक्त राज्य शासनाकडे दाद मागणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यासाठी नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येत दोन दिवस आंदोलने केली, जिल्हाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून त्यांना तीन तास घेरावही घातला; मात्र मंगळवारी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच या संदर्भात बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकून शासन दरबारी बाजू मांडण्याची मिळालेली संधी लोकप्रतिनिधींनी गमावली. जिल्हाधिकारी हे शासनाचे एक प्रतिनिधी असून, त्यांनी बोलविलेली बैठकही शासकीय होती, या बैठक बोलविण्यामागचा हेतूदेखील लोकप्रतिनिधींना पाणी सोडण्याबाबत अवगत करणे व या प्रश्नी त्यांची भूमिका समजावून घेऊन ती शासनापर्यंत पोहोचविणे असा होता; मात्र लोकप्रतिनिधींनी त्याकडे पाठ फिरवून एक प्रकारे दुटप्पी नीतीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे या प्रश्नी आक्रमक असलेले सेना आमदार अनिल कदम यांची गैरहजेरी पाहता, कल्याण-डोंबिवलीच्या सत्तेचे समीकरण जोडण्यासाठी भाजपाची नाराजी नको म्हणून सेना नेतृत्वाने डोळे वटारले की काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील पाण्याबाबत लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे मांडाव्यात, असा सल्ला या बैठकीत दिला. मुळात जिल्हाधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींनी काय करावे किंवा करू नये हे सांगायचा त्यांना अधिकार नाही, या उपरही ते सल्ला देत असतील तर ते स्वत:ला शासनाचे प्रतिनिधी समजत नसावेत असाच अर्थ त्यातून निघतो. (प्रतिनिधी)शासनाकडे दाद मागण्याचा पर्याय

जायकवाडीत सध्या असलेल्या पाणी साठ्यातून त्यांची पिण्याची तहान भागविली जाऊ शकते हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत असले तरी, जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यावर ठाम राहिलेल्या जलसंपदा विभागाला चाप लावण्यासाठी आता फक्त राज्य शासनाकडे दाद मागणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. या प्रश्नी आक्रमक असलेले सेना आमदार अनिल कदम यांची गैरहजेरी पाहता, कल्याण-डोंबिवलीच्या सत्तेचे समीकरण जोडण्यासाठी भाजपाची नाराजी नको म्हणून सेना नेतृत्वाने डोळे वटारले की काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे.