नाशिक : शहरात दुचाकी वाहनांबरोबरच चारचाकी वाहनांचीही चोरी होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत़ द्वारका परिसरातून ट्रक तर सरकारवाडा परिसरातून इनोव्हा कार चोरट्यांनी चोरून नेली असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ द्वारकाजवळील ट्रॅक्टर हाउसजवळून १५ ते १९ जानेवारीदरम्यान चोरट्यांनी अशोका लेलॅण्ड कंपनीचा (एमएच १८, ९१८३) पाच लाख रु पये किमतीचा ट्रक चोरून नेला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून (एमएच २९ एसी ७०२१) क्र मांकाची तीन लाख पन्नास हजार रु पये किमतीची इनोव्हा कार चोरीस गेली आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शहरात वाहनचोरीचे सत्र
By admin | Updated: January 21, 2015 01:56 IST