कर्नाटक येथील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यापारी तौफिक फय्याज अहमद अन्सर (४०,रा. चिकमंगलूर, कर्नाटक) यांच्याकडे १२ टन आले (अद्रक) खरेदी करावयाचे आहे, असे सांगून व्यवहार केला. तौफिक हे ट्रकमध्ये सुमारे २५० पोती भरुन आले घेऊन नाशकात दाखल झाले असता शनिवारी (दि.१२) मोसिन व त्याच्या मित्रांनी मिळून संगनमताने त्यांच्या ट्रकमधून आल्याच्या सर्व पोती अन्य वाहनांमध्ये परस्पर भरुन घेत पोबारा केल्याची घटना घडली होती. तौफिक यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंबड पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, श्रीकांत निंबाळकर यांनी स्वतंत्र पथक तयार केले. पथकाने वडाळागावातील संशयिताच्या पत्त्यावर धडक दिली; मात्र पत्ता बनावट असल्याचे पुढे आले.
संशयितांनी ज्या मालवाहू वाहनातून आल्याची पोती लांबविली. त्या वाहनाच्या आरटीओ नोंदणी क्रमांकावरुन पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली. यावरुन चोरीचा आले खरेदी करणारा व्यापारी पोलिसांच्या हाती लागला. त्यास विश्वासात घेत संशयितांकडून काही रक्कम घ्यावयाची असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
--इन्फो---
...असे अडकले जाळ्यात
आले खरेदी करणाऱ्या दुसऱ्या व्यापाऱ्याला उरलेली रक्कम परत देण्यासाठी पंचवटी येथील मार्केट यार्डात संशयित मोहसीन अकील शेख (२९,रा.शिवाजीनगर, सातपूर), अबरार महेबूब बागवान (२७,रा. बागवानपुरा, जुने नाशिक) हे दोघे कारमधून आले. पथकाला खात्री पटताच तपासी अधिकारी राकेश शेवाळे, रवी पानसरे, चंद्रकांत गवळी, हेमंत आहेर आदींनी शिताफीने या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्या ताब्यातून दोन मोटारी व दोन लाख २० हजार रुपयांची रोकड असा सुमारे ६ लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
--इन्फो---
बनावट धनादेशाद्वारे मिरची लुटल्याचीही कबुली
कोल्हापूर येथील शेतकरी संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून संशयित मोहसीन याने १५ लाख रुपयांचा व्यवहार करत मिरची खरेदी करुन जागेवर रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. पाटील जेव्हा मिरची घेऊन शहरात आले तेव्हा या संशयिताने त्यांना पाथर्डीफाटा येथे बोलावून घेतले. तेथे मिरचीचे पोती दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन बनावट धनादेश लिहून देऊन देता पोबारा केला होता. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचीही उकल झाली असून या लबाड बनावट व्यापाऱ्यांनी मिरची लांबविल्याचीही कबुली दिली आहे.