वडनेरभैरव : वाढत्या प्रदूषणाला अति ताणतणावाच्या जीवनाला समस्त मानवजात वैतागलेली दिसून येते. विशेषत: झपाट्याने वाढणारी शहरे आणि लोकसंख्या यामुळे वनक्षेत्र कमी होताना दिसत आहे. साहजिकच शहरामध्ये राहणाऱ्या लहान-मोठ्या विशेषत: युवा पिढीचा ओढा हा गड-किल्ले, दुर्गम भाग, जंगल आणि पाणवठ्याच्या ठिकाणाकडे वाढू लागलेला आहे. ग्रामीण खेडी-गावे यांना भेटी देणे, तेथील संस्कृती, लोककलांचा अभ्यास करणे गडकोटाचे सुळके आणि चढाई करणे अशा अनेक अंगांनी पर्यटनाचे क्षेत्र विकसित होत चाललंय. थोडक्यात निसर्ग पर्यटन आणि वन पर्यटन ही संकल्पना आता नाशिकमध्ये चांगलेच बाळसे धरायला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नाशिक वनविभागानेही कंबर कसली असून, पर्यटकांसाठी आता नाशिक जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणी ‘इको-टुरिझम’ प्रकल्प पर्यटनाच्या अंगाने विकसित करत आहे. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्रप्रकल्प, वन क्षेत्रातील दुर्ग, जलस्थळे अशा अनेक प्रकल्पांबरोबरच ‘निसर्ग पर्यटन’ विकसित केल्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रातही भर पडणार हे निश्चित !वनविभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या क्षेत्राचे संरक्षण करण्याबरोबरच संवर्धन करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रानाही या कामासाठी बरोबरीने घेतले आहे. शासनाच्या या धोरणाद्वारे या अभिनव पद्धतीने आखल्या गेलेल्या योजनेनुसार महाराष्ट्र निसर्गपर्यटन विकास मंडळ (महाराष्ट्र इको टुरिझम प्रमोशन बोर्डे) स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या मदतीने वनविभागाने स्थानिक पातळ्यांवर ‘संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केल्या आहेत. यातून स्थानिकांच्या मदतीने वनपर्यटनाच्या अंगाने अनेक उपक्रम राबविले जात आहे. यातून वनसंरक्षण आणि संवर्धनाबरोबरच स्थानिकांना रोजगार निर्मितीही झालेली आहे. ‘निसर्ग पर्यटन केंद्र’ हे पर्यटकांनाही विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवते. या प्रकल्पातून निसर्ग संवर्धनाबरोबरच त्या ठिकाणाचा नैसर्गिक कायापालट झालेला दिसून येतो.निसर्ग पर्यटन केंद्र, हट्टी (धोडप परिसर) विकासकामे धोडप किल्ला (हट्टी परिसर) निसर्ग पर्यटन स्थळांचे विविध विकासकामे करण्यात आलेली आहे. प्रथम रोपवन घेण्यात आली आहे. पूर्व पावसाळी कामे करून हे रोपवन तयार करण्यात आले आहे. प्रथम रोपवनावर संयुक्त वनव्यवस्थापन समितीतर्फे कामे करण्यात आली आहे. तसेच १३ वा वित्त आयोगाअंतर्गत खोल सलग समतल चर खोदणे नैसर्गिक पुननिर्मितीची कामे पाच हेक्टर कृत्रिम पुननिर्मितीची कामे पाच हेक्टर हट्टी ते धोडप किल्ला पाउलवाट दुरुस्तीची कामे करण्यात आली.सन २०१३-२०१४ मध्ये केपा अंतर्गत पुन्हा ३० हेक्टर द्वितीय वर्षीय रोपवन करण्यात आले. तसेच १३ व्या वित्त आयोगांतर्गत तीन वन बंधारे २२ हेक्टर सलग समतल चर २८० घ.मी. दगडी बांध घालणे आणि एक मोठा माती बंधारा अशी जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली. पाच हेक्टरवर साग स्टम्प लागवड प्रथम वर्षी करण्यात आली. नैसर्गिक पुननिर्मिती योजनेत्तर अंतर्गत ६५ हेक्टरवर कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हा वार्षिक योजना सन २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये बिगर आदिवासी योजनेअंतर्गत निसर्ग पर्यटन विकासकामांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यामार्फत पेगोडा, अंतर्गत रस्ते, पर्यटकांसाठी वाहनतळ, पार बांधणे, ओटे बांधणे, विविध सिमेंट बाक तयार अशी कामे केली. संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत डबल स्टेज पेगोडा, तार कुंपण, प्रवेशद्वार, रस्ता दुतर्फा, उंच रोपे लागवड, सौरदिवे बसविणे इत्यादि अनेक कामे केली गेली. (वार्ताहर)
धोडप किल्ला होतोय पर्यटन स्थळ
By admin | Updated: January 13, 2017 00:33 IST