अभोणा : अभोणा-नांदुरी मार्गावरील चिंचबारी घाटात दरड कोसळून तीन युवक जखमी झाले. वैभव सूर्यवंशी, दिगंबर भामरे, पंकज जाधव हे इंडिका (क्रमांक एमएच ४१ व्ही. ०२४९)कारने नाशिककडे जात होते. दरम्यान, चिंचबारी घाटात आले असता, त्यांच्या वाहनावर अचानक मोठा दगड कोसळला. त्यात वैभव सूर्यवंशी, भामरे, जाधव गंभीर जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून तिघेही बचावले. अभोणा येथील नागरिकांनी घाटातील डोंगर कपाऱ्यांना दरड प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. नांदुरी-अभोणा मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणीही निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रती कळवण प्रांताधिकारी अंकुश जाधव, तहसीलदार अनिल पुरे यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनावर शंकर मराठे, हरिश्चंद्र देसाई, भावराव सोनवणे, प्रमोद सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
दरड कोसळून तीन युवक जखमी
By admin | Updated: October 11, 2015 22:13 IST