शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

भूसंपादनांसाठी पाहिजेत साडेचार हजार कोटी

By admin | Updated: March 18, 2015 00:18 IST

नवीन कायद्याच्या कचाट्यात पालिका : आर्थिक तरतूद करण्यासंबंधी महासभेवर प्रस्ताव

नाशिक : वेगवेगळ्या माध्यमांतून पै-पै जमा करत आर्थिक परिस्थितीशी झगडणारी नाशिक महानगरपालिका सन २०१३ मध्ये आलेल्या नवीन भूसंपादन कायद्याच्या कचाट्यात सापडली असून, नव्या कायद्यानुसार पालिकेला २३४ भूसंपादनांच्या प्रस्तावांसाठी ढोबळमानाने सुमारे ४,४६५ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झालेली महापालिका आता एवढ्या पैशांचे नियोजन कसे करावे, या पेचात सापडली असून, भूसंपादनांसाठी भरीव आर्थिक तरतुदीचे नियोजन करण्यासाठी धोरण निश्चितीसंदर्भात मिळकत विभागाने बुधवारी (दि.१८) होणाऱ्या महासभेत प्रस्ताव ठेवला आहे. केंद्र शासनाने भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना कायदा सन २०१३ मध्ये संमत केला असून, सदर कायद्याची अंमलबजावणी राज्यात सन २०१४ पासून सुरू झालेली आहे. नवीन भूसंपादन कायदा अंमलात आल्याने आता जमीनमालकांकडून प्रारुप निवाड्यावर असलेल्या प्रकरणातही नव्या कायद्यानुसार मोबदला रकमेची मागणी पालिकेकडे होऊ लागली आहे. शहरातील विविध आरक्षणे व डी.पी.रोडकरिता भूसंपादन विभागामार्फत भूसंपादनांचे प्रस्ताव कार्यान्वित आहेत. त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधान्यक्रम अंतर्गत ४६ प्रस्ताव असून, इतर प्रस्तावांमध्ये कलम १२७ नुसार जमीनमालकांसह विविध विभागांनी केलेल्या मागणीनुसार १६१ भूसंपादनांचे प्रस्ताव कार्यान्वित आहेत. महापालिकेने सद्यस्थितीत कलम १२७ नुसार १८ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेले आहेत, तर ९ प्रस्ताव अद्याप सादर होणे बाकी आहेत. महापालिकेने आतापर्यंत ३८ प्रस्ताव भूसंपादन प्रक्रियेद्वारे, ५५ प्रस्ताव वाटाघाटीद्वारे, तर ६९६ आरक्षणे भागश: तर काही पूर्ण आरक्षणे व डी.पी.रोड यासाठी टीडीआरद्वारे डी.आर.सी. प्रमाणपत्रे अदा करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूसंपादनांचे अनेक प्रस्ताव वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. मात्र, त्यातील बरेसचे प्रस्ताव जुन्या भूसंपादन कायद्यानुसार कार्यान्वित असून, त्यातील ६५ प्रस्तावांमध्ये महापालिकेने प्रारुप निवाडा व अनामत रकमेपोटी ५६ कोटी ६५ लाख रुपये भूसंपादन कार्यालयाकडे जमा केलेले आहेत. परंतु, आता नवीन भूसंपादन कायदा लागू झाल्याने जागामालकांकडून नव्या कायद्यानुसार मोबदल्याची मागणी होऊ लागली आहे. नवीन कायद्यानुसार महापालिका वाढीव मोबदला देण्यास तयार आहे किंवा नाही, याबाबतची विचारणाही भूसंपादन विभागाने महापालिकेला केलेली आहे. नवीन कायद्यानुसार महापालिकेला एकूण २३४ प्रस्तावांसाठी ४४६५ कोटी रुपयांची गरज भासणार असून, महापालिकेने आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केवळ १४० कोटी ७३ लाख रुपये जमा केलेले आहेत. साडेचार हजार कोटींची रक्कमही सन २०१४ च्या बाजारमूल्यानुसार आधारित आहे. ती चालू बाजारमूल्यानुसार अपेक्षित धरल्यास त्यात आणखी वाढ होऊ शकते. महापालिकेचे वास्तव अंदाजपत्रक १२०० कोटींच्या आसपास असताना भूसंपादनांसाठी साडेचार हजार कोटी रुपये आणायचे कुठून या पेचात महापालिका सापडली असून, महासभेनेच त्यासंबंधी आर्थिक नियोजन करावे व धोरण निश्चिती ठरवावी, यासाठी मिळकत विभागाने प्रस्ताव सादर केला आहे.