महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचे पगार जिल्हा परिषद, उपसंचालक कार्यालय आणि पे युनिट कार्यालयांच्या मार्फत उशिरा दिले जात आहेत. या तक्रारीचा बराच काळ निराकरण झाले नाही. त्याचे परिणाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना भोगावे लागत आहेत. या संदर्भात उर्दू शिक्षक संघाचे साजिद निसार अहमद यांनी १७ मे रोजी शिक्षण आयुक्त विशाल सालंकी यांना निवेदन देऊन मागणी केली होती की, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीमार्फत महिन्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत दिले जावे. सर्व जिल्ह्यांना आदेश द्यावेत. कार्यवाही सुरू करताना शिक्षण आयुक्त कार्यालयातून व्ही. के. खांडके यांनी १४ जून २०२१ रोजी संचालक शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे आणि संचालक प्राथमिक, पुणे यांच्या नावावर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संदर्भात देऊन आदेश जारी केले आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत शिक्षकांना मिळणार वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST