शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक सहलींसंदर्भात शिक्षकांपुढे पेच

By admin | Updated: February 9, 2016 22:57 IST

शासनाचा आदेश : समुद्र, पर्वत, टेकड्या, तलाव आदि ठिकाणांवर बंदी

 द्याने : शासनाच्या विविध शैक्षणिक सरकारी आदेशांनी वैतागलेल्या शिक्षकांवर आता राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे ‘सहल नको, पण नियम आवरा’ असे म्हणण्याची वेळ शाळा आणि शिक्षकांवर आली आहे. समुद्र, पर्वत, टेकड्या, नदी, तलाव, विहीर, अ‍ॅडव्हेंचर पार्क, साहसी खेळाची ठिकाणे, वॉटर पार्क ही सगळी ठिकाणे वगळून इतर ठिकाणी सहल न्यावी, असा अजब फतवा शिक्षण विभागाने काढल्याने सहल नेमकी काढायची तरी कुठे? यातही सकाळी जाऊन संध्याकाळी ५ वाजण्याच्या आत विद्यार्थ्यांना पुन्हा परत शाळेत येऊन घरी जाता येईल असे ठिकाण शैक्षणिक सहलीसाठी निवडावे असा आदेश असल्याने असे ठिकाण शोधायचे तरी कुठे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. इतकेच नव्हे तर रेल्वेमार्ग आहे; पण रेल्वेचे फाटक नाही अशा ठिकाणी रेल्वे पुढे गेली आहे की मागे आहे, येणार असेल तर किती वेळात येणार याची खात्री करूनच बस पुढे जाऊ देण्याची जबाबदारीसुद्धा शिक्षकांनीच घ्यायची आहे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याचे हमीपत्रही सहलीपूर्वी शिक्षण विभागाला लिहून द्यायचे आहे.एका महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान झालेल्या अपघातानंतर उच्च शिक्षण विभागासोबत शालेय शिक्षण विभागालाही जाग आली. शालेय विद्यार्थ्यांची त्यांना काळजी वाटू लागली आहे. मात्र अपघात झाल्यानंतर होणारी टीका लक्षात घेता अपघात टाळण्यासाठी सहलीची जोखीमच शासनाला नको की काय, असे या नव्या आदेशामुळे वाटू लागले आहे.केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना वेगळे काही अनुभव घेता यावेत यासाठी शैक्षणिक सहल हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. शैक्षणिक सहल केवळ आवश्यकच नसून शाळांच्या उपक्रमांत ते बंधनकारकही आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सहल काढताना काय काय काळजी घ्यावी आणि कोणते नियम पाळले जावेत याबाबत तातडीने पत्र काढले. मात्र नुसती ‘काळजी घ्या’ एवढेच त्यात सांगितले नसून अगदी बारीकसारीक तपशिलांसह तब्बल २७ कलमांची नियमावलीच शिक्षण उपसंचालकांनी लागू केली आहे.ज्या सहलीमध्ये विद्यार्थिनी असतील त्या सहलीबरोबर एक महिला पालक असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेच्या एका सहलीची परवानगी काढण्यासाठी गटशिक्षणाधिकारी ते शिक्षण उपसंचालक असा पल्ला शाळांना गाठावा लागणार आहे. हे सगळे नियम करूनही शिक्षकांकडून ते मोडले गेलेच तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकारही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे नियम पाळले जातील, अपघात होणार नाही आणि विद्यार्थी सुरक्षित घरी परततील असे लेखी हमीपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर सहलीपूर्वी लिहून देण्याचेही बंधनही या आदेशान्वये घालण्यात आलेले आहे.यातील काही अटी आणि नियम हे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असले, तरी बरेचसे नियम हे शाळा आणि शिक्षकांच्या दृष्टीने किचकट असल्याने शाळांच्या लांब पल्ल्याच्या सहलींवर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे. (वार्ताहर)