शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नाशिककरांना उन्हाळा तापदायक : तपमानाची चाळीशी

By admin | Updated: April 3, 2017 15:16 IST

यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. कारण दीड दशकानंतर नाशिककरांनी प्रथमच मार्च महिन्यातच तपमानाची चाळीशी अनुभवली.

नाशिक आॅनलाइन लोकमत : यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. कारण दीड दशकानंतर नाशिककरांनी प्रथमच मार्च महिन्यातच तपमानाची चाळीशी अनुभवली. त्यामुळे आता एप्रिल व पुढच्या मे महिन्यामध्ये वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेची चिंत थंड वातावरणाच्या शहरात राहणाऱ्या नाशिककरांनही सतावत आहेत. हंगामातील सर्वाधिक ४०.३ इतका तपमानाचा उच्चांक अद्याप नोंदविला गेला आहे.शहराच्या कमाल तपमानात २३मार्चपासून सातत्याने वाढ होत होती. तपमानाचा पारा ३८अंशाच्या वर सरकत होता. २९ मार्चपर्यंत तपमान ४०.३ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककरांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागला. यावर्षी हवामान खात्यालादेखील मार्चमध्येत तपमानाने गाठलेल्या चाळीशीचा धक्का बसला. येथील पेठरोडवर असलेल्या हवामान खात्याच्या कार्यालयात हंगामातील सर्वाधिक तपमानाची नोंद २६मार्च रोजी तपमानाने चाळीशी गाठली आणि ४०.१ इतक्या तपमानाची नोंद झाली. त्यानंतर सलग तीन दिवस शहरत ४०.३ इतके कमाल तपमान कायम होते. हवामान खात्याने शहरवासियांनी उष्णतेची लाट आल्याचा इशाराही दिला होता. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सोशल मिडियापासून तर प्रशासनापर्यंत सर्वांकडूनच उपाययोजनांचा जागर केला जात होता. दीड दशकानंतर यंदा मार्च महिन्यातच अचानकपणे पारा चाळीशीपार का गेला? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. वाढत्या तपमानामुळे शहराचे हवामान बदलले असून एकेकाळी थंड वातावरणाचे शहर असा नावलौकिक मिरविणाऱ्या नाशिकमध्येही ऊन तापू लागले आहे. यामुळे भविष्याच्या दृष्टीने नाशिककरांसाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे.

याबाबत नाशिककरांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शहराबाहेरील विविध रस्ते जे मुंबई- पुणे-आग्रा-औरंगाबाद या महामार्गांना जोडतात अशा रिंगरोडचे विस्तारीकरण करण्यात आले. यावेळी या रस्त्यांच्या रुं दीकरणामध्ये अडथळा ठरणारे बहुसंख्य झाडे तोडली गेली. या झाडांच्या मोबदल्यात महापालिकेने वृक्ष लागवडीचे तोकडे प्रयत्नही केले; मात्र अद्याप वृक्ष जगलेले नसल्याने कदाचित जमीनीची अधिक धूप होऊन शहराच्या तपमान मार्चमध्येच चाळीशी पार गेले असावे, असा तर्क तज्ज्ञांकडून लावला जात आहे.चालू वर्षाच्या मार्चमधील तपमानदिनांक        तपमान२० मार्च -     ३३.९२१ मार्च -     ३६.०२२ मार्च -     ३७.३२३ मार्च -     ३८.१२४ मार्च -     ३८.१२५ मार्च -     ३८.४२६ मार्च -      ४०.१२७ मार्च -      ४०.३२८ मार्च -      ४०.३२९ मार्च -       ४०.३तपमानाच्या चाळीशीचा पुर्व इतिहासवर्ष (महिना) -- कमाल तपमान १६ एप्रिल २०१०-४२.०२७ एप्रिल २०११-४०.४८ एप्रिल २०१२-४०.०१ मे २०१३-४०.६७ मे २०१४-४०.०२० एप्रिल २०१५-४०.६१८ मे २०१६-४१.०१९ एप्रिल २०१६-४१.०२७ मार्च २०१७-४०.३

२०१०चा रेकॉर्ड मोडणार ?दीड दशकानंतर मार्च महिन्यात तपमानाने चाळीशी ओलांडली. दरम्यान, दोन दिवसांपासून पुन्हा शहरातील डेरेदार हिरवीगार वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यास सुरूवात झाल्याने या एप्रिलमध्ये २०१० सालाचा रेकॉर्ड मोडण्याची भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. २०१०साली एप्रिलमध्ये सर्वाधिक ४२.२ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. सात वर्षांमधील हा सर्वाधिक उच्चांक आहे. अद्याप ४२.२च्या नोंदीचा विक्रम मोडलेला नाही; मात्र या वर्षी मार्चमधील उन्हाळ्याची तीव्रता बघता एप्रिलच्या अखेरपर्यंत तपमानाचा पारा ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.