नाशिक : जिल्'ात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकराशे कोटींहून अधिक शेतपिकांचे नुकसान झालेले असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करून शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. रावसाहेब थोरात सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. त्यात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आदि उपस्थित होते. सभेत जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे कृषी विभागाची माहिती देत असताना, सदस्य गोरख बोडके यांनी जिल्'ातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विचारली. तसेच इगतपुरी तालुक्यासह जिल्'ातील सर्वच नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ भरपाई मिळावी, असा ठराव केला. प्रा. अनिल पाटील यांनी या ठरावात दुरुस्ती करताना शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व्हावे या मागण्यांचा ठरावात समावेश केला. बोराडे यांनी नाशिकसह इगतपुरी, चांदवड, कळवण, बागलाण, येवला या भागांत एकाच दिवसात ४६२ मिलिमीटर पाऊस पडल्याने द्राक्ष व कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याची माहिती दिली. शैलेश सूर्यवंशी यांनी बागलाण तालुक्यात कांदा, द्राक्ष, डाळींब या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करून शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव संमत करून तो शासनाला पाठविण्याचा निर्णय झाला.
अवकाळी पावसाची तत्काळ नुकसानभरपाई मिळावी
By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST