नाशिक (प्रतिनिधी) : पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेसाठी सोहम सुभाष तमखाने याची निवड झाली आहे. सोहम हा फ्रावशी अकॅडमीचा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी आहे. सोहम याने सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. त्याच्या यशाबद्दल रतन लथ, चढ्ढा यांनी कौतुक केले आहे. प्रशिक्षक डोंगरे यांचे त्यास मार्गदर्शन लाभले. सोहम हा येत्या २९ रोजी पंजाब येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.
सोहम तमखाने याची फुटबॉल टेनिससाठी निवड
By admin | Updated: January 23, 2015 01:25 IST