नाशिक : शहर वाहतूक बसवर स्कॉर्पिओतील संशयितांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडली़ या प्रकरणी चार संशयितांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या दैनंदिन नियोजनानुसार शहर बस (क्रमांक : एमएच ४०, एन ९४३२) घेऊन बसचालक शरद रामनाथ वाघ (४७, अलकापुरी हौसिंग सोसायटी, श्रीकृष्णनगर, आडगाव नाका) हे शुक्रवारी गंगापूरला गेले होते़ त्यावेळी संशयित आशिष नाना पवार (३२, रा़ गंगापूर गाव बसस्टॉपजवळ, नाशिक) व त्याच्या चार साथीदारांनी बारदान फाट्यावर स्कॉर्पिओ (क्रमांक : एमएच १५, डीएस ८४२८) लावून बस अडवली व दगडफेक केली़ यामध्ये शहर बसची पुढची काच फुटून ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद शरद वाघ यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ (प्रतिनिधी)
दगडफेक केल्याची धक्कादायक घटना
By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST