शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

लासलगाव बाजार समिती विभाजनाचा ठराव

By admin | Updated: November 14, 2015 23:14 IST

लासलगाव बाजार समिती विभाजनाचा ठराव

लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आता तिसऱ्यांदा विभाजन होण्याची शक्यता असून, शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने लासलगाव व निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती होण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला आहे.शनिवारी सभापती नानासाहेब पाटील यांच्या अध्यक्षततेखाली संचालक मंडळाची सभा पार पडली. यावेळी उपसभापती इंदुमती तासकर, संचालक जयदत्त होळकर, शिवाजीराव ढेपले, बाळासाहेब क्षीरसागर, विजय सदाफळ, भास्करराव पानगव्हाणे, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, शिवाजी तासकर, तानाजी पूरकर, नंदकुमार डागा, प्रमोद शिंदे, सुरेखा नागरे, राजाराम दरेकर, छाया इकडे, बबनराव सानप, दिलीप गायकवाड व सचिव बी.वाय होळकर आदि उपस्थित होते.या सभेत लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षत्र ६२ गावांचे असून, त्याचे विभाजन करून परिसरातील ३३ गावांकरिता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तर निफाड, नैताळे व उगाव या तीन उपआवारासाठी निफाड येथे कार्यालय असणारी निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती होण्यासाठी ठराव बहुमताने पारीत झाला, तर लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील ३३ गावांमध्ये लासलगाव येथील मुख्य आवारासह विंचूर व खानगावनजीक हे दोन उपआवार असण्याची शक्यता आहे. बाजार समितीला चालू आर्थिक वर्षात तीन कोटी १३ लाख ७३ हजार रु पयांचा खर्च वजा जादा वाढ झालेली आहे तर चालूवर्षी लासलगाव येथील बाजार समितीच्या आवारात सव्वासहा अब्ज रुपयांची उलाढाल झाली आहे. तसेच गुंतवणूक दहा कोटी रु पयांची आहे. यापूर्वी निफाड तालुका व चांदवड तालुक्याकरिता एकच लासलगाव कृषी उत्पन्न समिती होती. त्यानंतर १ आॅक्टोबर १९८२ रोजी विभाजन होऊन निफाड तालुक्यातील गावांकरिता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची, तर चांदवड तालुक्यातील गावांची चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. त्यानंतर २८ डिसेंबर १९९५ रोजी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून लासलगाव व पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. या दोन्ही वेळेस शासन नियुक्त संचालक मंडळात सत्ताधारी नेत्यांसह संचालक होते. त्यानंतर शनिवारी (दि.१४) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाने लासलगाव व निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा ठराव बहुमताने सहमत केला आहे. संचालक मंडळाची मुदत दि. ३ नोव्हेंबर रोजी संपलेली आहे. या नवनिर्मित लासलगाव व निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाची घोषणा करण्याची भाजपा व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची हालचाल सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्यातील कृषी उत्पन्ना बाजार समितीच्या निवडणुकांकरिता शासनाने दि. २२ जानेवारी २०१६ पर्यंत घेण्यास मुदतवाढ दिलेली आहे. (वार्ताहर)