शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

दुर्मिळ नाणी, ऐतिहासिक वस्तूंचा खजिना

By admin | Updated: January 9, 2017 01:37 IST

रेअर फेअर प्रदर्शनाचा समारोप : विस्मृतीत गेलेल्या वस्तूंचादेखील समावेश; नागरिकांचा प्रतिसाद

नाशिक : विविधरंगी आणि विविध आकारातील नोटा, अनेकविध नाणी, दुर्मिळ तसेच परदेशी चलन, पोस्टाची तिकिटे यासह ऐतिहासिक वस्तू, वेगवेगळे रत्न आणि विस्मृतीत गेलेल्या वस्तूंचे अनोखे ‘रेअर फेअर २०१७’ या प्रदर्शनाचा रविवारी समारोप करण्यात आला. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कलेक्टर्स सोसायटी आॅफ न्यूमिसमॅटिक अ‍ॅण्ड रेअर आयटम्स नाशिक यांच्यातर्फे जुना गंगापूर नाका येथील चोपडा लॉन्स येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ चलनांबरोबरच फिलाटेलीक पोस्टाची तिकिटे, मिनिएचर पेंटिंग, स्वातंत्र्यकाळानंतरची प्रसिद्ध केलेली विशेष नाणी, ठरावीक सण, उत्सव तसेच नेत्यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करण्यात येणारी नाणी, शिवराई, तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची विदेशी नाणी आणि नोटा, आकर्षक नंबरच्या सीरिजची नाणी या ठिकाणी मांडण्यात आली आहे. रेअर फेअर प्रदर्शनात ‘शिवराई’ या शिवकालीन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन बघण्यासाठीदेखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिवराई या दुर्मिळ नाणेसंग्रहात शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांच्या काळातील असंख्य नाणी बघायला मिळतात. शिवाजी महाराजांनी रायगड येथे छापलेला एक पैसा, अर्धा पैसा आणि पाव पैसा तसेच उर्दू नाण्यांवर मोहोर उमटवलेल्या शिवराई येथे ठेवण्यात आल्या आहेत.चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, इतिहास अभ्यासक मंजिरी भालेराव, बिंदू महाराज, सुशीलकुमार अग्रवाल, जयंत हुन्नरगीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. इतिहास अभ्यासक मंजिरी भालेराव यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाला शुभेच्छा देताना नाशिकची युवापिढी या प्रकारचा संग्रह करतेय ही चांगली बाब असल्याचे सांगितले. नाशिक शहराकडे वारसा स्थळ म्हणून बघितले जात असताना नाण्यांबरोबर इतरही वारसा जपायला हवा, असे आवाहन केले. यावेळी गिरीश शर्मा (इंदोर), जयंत हुन्नरगीकर (नाशिक) यांना उत्कृष्ट संग्रहाबद्दल ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)